​बंदुक्याचे दिग्दर्शक राहुल चौधरी करणार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 12:58 IST2017-10-23T07:28:21+5:302017-10-23T12:58:21+5:30

काहीजण काहीतरी हटके करायलाच जन्माला आलेले असतात. काहीतरी भन्नाट व्हिजन डोळ्यांसमोर असल्यावर सक्सेस फार काळ लांब राहू शकत नाही, ...

Producer of gunman Rahul Chaudhary | ​बंदुक्याचे दिग्दर्शक राहुल चौधरी करणार निर्मिती

​बंदुक्याचे दिग्दर्शक राहुल चौधरी करणार निर्मिती

हीजण काहीतरी हटके करायलाच जन्माला आलेले असतात. काहीतरी भन्नाट व्हिजन डोळ्यांसमोर असल्यावर सक्सेस फार काळ लांब राहू शकत नाही, हेही तितकेच खरे.  
काही दिवसांपूर्वी एका अशाच भन्नाट नावाने प्रोडक्शन हाऊस रजिस्टर झाले... तेषा गर्ल चाईल्ड प्रोडक्शन. आहे कि नाही काहीतरी विचार करायला लावणारे नाव? खरं तर नावात खूप काही दडलेले असते. आचार-विचार, स्वभाव, मानसिकता असे बरेच काही. हे नाव ऐकल्यावर फार कुतूहल निर्माण झाले आहे की अशा प्रकारे प्रोडक्शन हाऊसचे नाव का दिले असावे?
आताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी गौरविलेला, एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा "बंदूक्या"... या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी बंदुक्याच्या दिग्दर्शना नंतर आता स्वतः चित्रपट निर्मितीमध्ये उतरायचे ठरविले असून त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राहुल चौधरी यांनी तेषा गर्ल चाईल्ड प्रोडक्शन नव्याने सुरू केले असून त्या अंतर्गत ते या नवीन सिनेमाची निर्मिती-दिग्दर्शन करत आहेत. तसेच या नवीन सिनेमाचे नाव लवकरच अनाऊन्स करू असे त्यांनी सांगितले आहे. 
प्रोडक्शन हाऊसच्या अशा वेगळ्या नावानंतर, आता सिनेमाचे नाव नक्की काय असणार आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
'बंदूक्या' या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केलं असून यात आतिषा नाईक, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा राहुल चौधरी आणि नामदेव मुरकटे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. हा सिनेमा मनोरंजनाचे उत्तम पॅकेज होता. यातील कथा वेगळी होती. यातील हिरो प्रेक्षकांना इतर चित्रपटातील हिरोंसारखा नव्हे तर वेगळाच वाटला होता. या सिनेमाची गाणी तुफान हिट ठरली होती. आदर्श शिंदेच्या रांगड्या आवाजातलं माझा ईर या गाण्याने तर तरुणाईला वेड लावले होते. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना दोघांना देखील भावली होती. 

Web Title: Producer of gunman Rahul Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.