व्हेंटिलेटरनंतर प्रियांकाचा 'काय रे रास्कला'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 16:33 IST2017-01-17T16:26:37+5:302017-01-17T16:33:23+5:30
बॉलिवुड कलाकार हे मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विदया बालन, सलमान खान या तगडया बॉलिवुड ...
.jpg)
व्हेंटिलेटरनंतर प्रियांकाचा 'काय रे रास्कला'
ब लिवुड कलाकार हे मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विदया बालन, सलमान खान या तगडया बॉलिवुड कलाकारांना मराठी चित्रपटात अभिनय करण्याचा मोह आवरला नसल्याचे प्रेक्षकांना पाहिले. तसेच या कलाकारांननंतर थेट बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने तर मराठी चित्रपट निर्मितीमध्येच पदापर्ण केले. काही दिवसांपूर्वीच तिचा व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियंका चोप्राने मराठी गाणेदेखील गायिले आहे. तिचे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. आता याच चित्रपटानंतर प्रियंका आणखी एक मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. काय रे रास्कला असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा नुकताच मुहुर्त पार पडला, यावेळी मधु चोप्रा, दिग्दर्शक गिरीधरन स्वामी, गौरव घाटणेकर, कुनिका सदानंद आदि कलाकार उपस्थित होते. मात्र प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रियंका चोप्रा स्वतः उपस्थित नव्हती. मात्र तिने या मुहुर्तावेळी व्हिडीयोद्वारे काय रे रास्कला च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशादेखील तिने व्यक्त केली आहे. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला सिनेमाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली आहे. संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. चला तर प्रियंकाच्या या आगामी मराठी चित्रपटाची वाट पाहूयात