प्रियदर्शन जाधव,प्राजक्ता हनमघर चित्रपटगृहात करणार‘धिंगाणा’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:33 IST2017-11-29T10:03:19+5:302017-11-29T15:33:19+5:30
समाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असत. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न मनोरंजनाच्या माध्यमातून करतानाच त्यावर ...

प्रियदर्शन जाधव,प्राजक्ता हनमघर चित्रपटगृहात करणार‘धिंगाणा’!
स ाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असत. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न मनोरंजनाच्या माध्यमातून करतानाच त्यावर तिरकसपणे भाष्य करणाऱ्या चित्रपटाने नेहमीच त्या विषयाची व्याप्ती दाखवून दिली आहे. ८ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘धिंगाणा’ हा विनोदी धाटणीचा चित्रपटही चीट फंड घोटाळ्यासारख्या मह्त्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. ममता प्रोडक्शन हाऊसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते समीर सदानंद पाटील असून दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर याचं आहे.कोणत्याही गोष्टीचा मोह हा वाईट असतो. झटपट पैसे कमवण्याच्या नादात फसव्या स्कीमला बळी पडणारे अनेकजण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. हाच धागा पकडून ‘धिंगाणा’ या चित्रपटात एका स्कीममध्ये अडकलेलं गाव व त्यातून गावकऱ्यांना बाहेर काढणाऱ्या राजाराम या युवकाची धडपड दाखवली आहे.राजारामची ही धडपड यशस्वी होणार? की तोच या जाळ्यात अडकणार याची मनोरंजक कथा म्हणजे ‘धिंगाणा’ हा चित्रपट. या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे रझा मुराद, शाहबाझ खान, अवतार गिल, कुनिका या हिंदीतल्या खलनायकांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हिंदीतल्या या कलाकारांसोबत प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर, प्रकाश धोत्रे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
जय अत्रे, वैभव जोशी, सचिन पाठक (यो) यांच्या लेखणीतून यातील गाणी सजली आहेत. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, राज्ञी त्यागराज यांनी या चित्रपटातील गाणी गायली असून संगीतकार अमित राज व शशांक पोवार यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. सुजीत कुमार यांनी या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला ‘धिंगाणा’ हा सिनेमा ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.