प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 10:54 IST2017-10-31T05:24:30+5:302017-10-31T10:54:30+5:30

राजकला मूव्हीज आणि बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट माझ्या बायकोचा प्रियकरचे दिग्दर्शक राजीव एस. रूईया आहेत. ...

Priyadarshan Jadhav, Bharat Ganeshapure, Aniket Vishwasrao's lead role, 'My wife's boyfriend' will soon be seen by the audience | प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जकला मूव्हीज आणि बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट माझ्या बायकोचा प्रियकरचे दिग्दर्शक राजीव एस. रूईया आहेत. चित्रपटांच्या नावातच कथा लपलेली आहे. कॉमेडी शैलीची झलक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची कथा आधारित असून प्रेक्षकांना या सिनेमात मनोरंजनाचा मसाला पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोघे, पदम सिंग, स्वाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रदिप के. शर्मा आणि दिपक रुईया या चित्रपटाचे निर्माते आहेत. 
‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटाची स्टार कास्ट ही भली मोठी असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. प्रियदर्शन जाधवने टाइमपास या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचा हलाल हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे प्रियदर्शन या चित्रपटात प्रेक्षकांना कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता लागलेली आहे. अनिकेत विश्वासराव, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे यांसारखे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने कलाकारांची एक छान भट्टी या चित्रपटात जमून आली आहे.
‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटात अनेक गाण्यांचा तडका देखील असणार आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ही चारही गाणी खूपच चांगली झाली आहेत. या गाण्यात प्रेक्षकांना एक आयटम साँग देखील पाहायला मिळणार आहे. हे गाणे मीरा जोशीवर चित्रीत करण्यात येणार आहे. हे धमाकेदार आयटम साँग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटांचे चित्रिकरण भोर तसेच मुंबई मधील फिल्मसिटी येथे करण्यात आले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Also Read : ​‘दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायला आवडते’- प्रियदर्शन जाधव

Web Title: Priyadarshan Jadhav, Bharat Ganeshapure, Aniket Vishwasrao's lead role, 'My wife's boyfriend' will soon be seen by the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.