प्रिया बापट, उमेश कामत, सुबोध भावे बनणार मराठी ‘बिग बॉस’चे स्पर्धक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:38 IST2018-04-13T09:08:46+5:302018-04-13T14:38:46+5:30
एक कार्यक्रम ज्याने ९२ हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले, एक कार्यक्रम ज्याने हिंदी, ...

प्रिया बापट, उमेश कामत, सुबोध भावे बनणार मराठी ‘बिग बॉस’चे स्पर्धक?
ए कार्यक्रम ज्याने ९२ हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले, एक कार्यक्रम ज्याने हिंदी, बांगला, तमिळ, तेलगु आणि कन्नड या भाषांमधून सगळ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकलीत, आता येत्या १५ एप्रिलपासून मराठमोळ्या रूपात बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे, ‘बिग बॉस’. होय, ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या या घरात कोण जाणार, ही उत्सुकता आहेच. चर्चा खरी मानाल ती, प्रिया बापट, उमेश कामत, जयवंत वाडकर, सुबोध भावे आणि उमेश कामत हे दिग्गज मराठी सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळणार आहेत. निश्चितपणे प्रिया बापट आणि उमेश कामत हे रिअल लाईफ कपल आणि सुबोध भावे सारखा दिग्गज अभिनेता ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी याही ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहेत. त्यांनी स्वत: याची माहिती दिली आहे. या सेलिब्रिटींशिवाय अन्य नावांचीही चर्चा जोरात आहे.
काहे दिया परदेस या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली सायली संजीव बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. शशांक केतकर, टाइमपास फेम प्रथमेश परब, दिल दोस्ती दुनियादारीमधील सुव्रत जोशी, एमटीव्ही रोडीज रायझिंग सेमिफायनलिस्ट शिव ठाकरे, होणार सून मी या घरचीमधील पिंट्या अर्थात रोहन गुजर यांची नावेही चर्चेत असल्याचे समजते.
ALSO READ : उषा नाडकर्णी झळकणार बिग बॉस मराठीमध्ये
‘बिग बॉस’चे आजवर आपल्याला अकरा सीझन पाहायला मिळाले आहेत. हे सगळेच सीझन हिट ठरले आहेत. अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, फराह खान, सलमान खान आणि संजय दत्त या सर्वांना ‘बिग बॉस’चा हिंदीतील हा शो होस्ट करतानाआपण पाहिले आहे. पण यापैकी सलमान खान हाच प्रेक्षकांचा सर्वाधिक लाडका होस्ट ठरलाआहे. मराठी ‘बिग बॉस’मध्ये अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर हे हे शिवधनुष्य पेलणार आहेत.