'हॉलिवूडचं बिनधास्तपणे कौतुक, तेच आम्ही केलं तर संस्कृती आड...'; प्रिया बापट संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:45 PM2023-12-27T18:45:28+5:302023-12-27T18:49:20+5:30

 नाटक, वेबसीरिज आणि सिनेमांमुळे प्रिया चर्चेत येते.

Priya Bapat Talks About Bold Scene and City Of dreams series | 'हॉलिवूडचं बिनधास्तपणे कौतुक, तेच आम्ही केलं तर संस्कृती आड...'; प्रिया बापट संतापली

'हॉलिवूडचं बिनधास्तपणे कौतुक, तेच आम्ही केलं तर संस्कृती आड...'; प्रिया बापट संतापली

अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट. सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.  नाटक, वेबसीरिज आणि सिनेमांमुळे प्रिया चर्चेत येते. दरम्यान आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.  मराठी अभिनेत्रींना संस्कृतीवरुन ट्रोल करणाऱ्यांवर प्रियाने अगदी परखडपणे तिचं मत मांडलं. तिच्या वक्तव्याने सार्‍यांचं लक्ष वेधलं आहे. 

प्रिया बापटने आरपारच्या 'वूमन की बात' या सेगमेंटमध्ये बोल्ड सीनवर भाष्य केले. ती म्हणाली, 'खुपदा कलाकारांना सोयीच्या हव्या त्या साच्यात पाहण्याचा प्रयत्न केला जातो. ते योग्य नाही. हिंदीतील, इतर भाषांमधील अथवा हॉलिवूडचे सिनेमे पाहताना तुम्ही त्यांच्याकडे पात्र म्हणून पाहता. त्यांचं कौतुक करता. काय मस्त काम केलं आहे, असे म्हणता. पण, जर हेच तुमच्या मराठी मुलीने केले की तुमची मराठी संस्कृती का आड येते, असा सवाल प्रियाने प्रेक्षकांना केला. 

पुढे ती म्हणाली, 'मराठी मुलगी मोठ्या पडद्यावर काम करु शकते. एक पात्र उत्तमप्रकारे साकारू शकते याचा तुम्हाला अभिमान का नाही. तुम्ही कशाला महत्त्व देता, एखाद्या पात्राच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या सीनला की जो मी संपुर्ण पात्राचा ग्राफ उभारलं त्याला. काम निवडताना सुद्धा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करुन निवडते. कोणी अंधारात ठेवून माझ्याकडून हे काम करुन घेत नाही. जेव्हा मी 'सिटी ऑफ ड्रिम्स'साठी ऑडिशन दिलं. तेव्हा माहिती होते की मला असे सीन करावे लागणार आहेत. मी जे पात्र साकारत आहे, ते या सर्व गोष्टींपेक्षा मोठं आहे. त्या पात्राच्या वैयक्तीक आयुष्याची ती किती गरज आहे, तेव्हा मी ते स्विकारते'.

प्रिया वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'प्रोडक्शन नंबर ८' या बॉलिवूड सिनेमात तिची वर्णी लागली आहे. सेजल सेठ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये प्रिया अभिनेता नवाजु्द्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ९०च्या काळातील गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. तर काकस्पर्श, टाईमपास-२,  टाईम प्लीज,  मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,  वजनदार या मराठी चित्रपटांबरोबरच मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे.

Web Title: Priya Bapat Talks About Bold Scene and City Of dreams series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.