प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:28 PM2021-01-28T13:28:28+5:302021-01-28T13:29:35+5:30

प्रिया आणि उमेशचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

priya bapat shares romantic picture with umesh kamat | प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्ही दोघे एकत्र खूपच छान दिसता... तुमचे कपल आमचे सगळ्यात आवडते कपल आहे असे त्यांचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच प्रियाने पती उमेश कामतसोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्रिया बापटने उमेश कामतसोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत लिहिले आहे की, टू हेड्स, वन आणि त्यासोबत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. 

प्रिया आणि उमेशचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तुम्ही दोघे एकत्र खूपच छान दिसता... तुमचे कपल आमचे सगळ्यात आवडते कपल आहे असे त्यांचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. प्रियाने हा फोटो शेअर करून केवळ दोन तास झाले आहेत. पण दोन तासांत ४५ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर काहीच तासांत चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.

उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.

Web Title: priya bapat shares romantic picture with umesh kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.