प्रिया बापट हिमाचलमध्ये करतेय समर एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 12:57 IST2017-05-05T07:27:04+5:302017-05-05T12:57:04+5:30
सध्या मुंबईत प्रचंड उकाडा असल्याने प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचे प्लानिंग करत आहे. आता या प्लानिंगमध्ये आपले मराठी कलाकार ...
.jpg)
प्रिया बापट हिमाचलमध्ये करतेय समर एन्जॉय
स ्या मुंबईत प्रचंड उकाडा असल्याने प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचे प्लानिंग करत आहे. आता या प्लानिंगमध्ये आपले मराठी कलाकार कसे मागे राहातील. सध्या अनेक मराठी कलाकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत किंवा एकटे सुट्टीचा आस्वाद घेत आहेत. प्रिया बापटदेखील उत्तरेत फिरायला गेली असून तिने ती खूप एन्जॉय करत आहे.
प्रिया बापट काही दिवसांपूर्वी भोपळमध्ये चित्रीकरण करत होती. भोपाळमध्ये चित्रीकरण संपल्यावर तिने हिमाचलमध्ये काही वेळ घालवायचा ठरवला आणि ती तिथे फिरायला गेली. सध्या ती तिथे ट्रेकिंगदेखील करच आहे. हिमाचलवरून तिने तिच्या चाहत्यांसोबत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. प्रिया आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हणते, मी डिसेंबरपासून सतत कुठे ना कुठे फिरतच आहे. गेल्या काही महिन्यात मी पाँडिचेरी, मेघालय, कोच्ची अशा विविध ठिकाणांना भेटी दिल्या आहेत आणि आता मी हिमाचलमध्ये आली आहे. हिमाचलमधील सौंदर्य, इथले वातावरण याच्या तर मी प्रेमात पडले आहे.
प्रियाने तिथे जाऊन ट्रेकिंग देखील केले आहे. तिच्या या ट्रेकिंगच्या अनुभवाविषयी ती सांगते, मी धर्मशाला जवळील धर्मकोट येथे पोहोचली. तिथून चालत मी ट्रेकिंग करत त्रियुंडचा डोंगर गाठला. मला हा डोंगर चढायला जवळजवळ अडीज तास लागला. हा डोंगर जवळजवळ साडे तीन हजार फूट उंचीवर आहे. इथला निसर्ग खूपच छान आहे.
प्रियाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्रियुंडचा निसर्गरम्य परिसर तिच्या चाहत्यांनादेखील दाखवला. तसेच ट्रेकिंगसाठी तिला मदत करणाऱ्या गाईटचीदेखील लोकांना ओळख करून दिली. एवढेच नाही तर डोंगर चढल्याने आता मला खूप भूक लागली असून मी जेवणावर ताव मारत असल्याचेही तिने तिच्या फॅन्सना सांगितले.