Exclusive बिग बींच्या उपस्थितीत या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:30 IST2016-12-08T11:30:05+5:302016-12-08T11:30:05+5:30

       priyanka londhe बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची उपस्थितीच एखादया कार्यक्रमाला चार चाँद लावून जाते. ...

In the presence of Exclusive Big B, this movie is a muharut | Exclusive बिग बींच्या उपस्थितीत या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

Exclusive बिग बींच्या उपस्थितीत या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

 
   priyanka londhe

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची उपस्थितीच एखादया कार्यक्रमाला चार चाँद लावून जाते. नुकतेच अमिताभजी एका मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताला उपस्थिती राहीले होते. गणेश आचार्य दिग्दर्शीत भिकारी या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईमध्ये पार पडला. यावेळी दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी या सोहळ््याला उपस्थित राहून चित्रपटाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या. अभिनेता टायगर श्रॉफ देखील या चित्रपटाच्या मुहूर्ताला एकदमच हटके अंदाजात पहायाला मिळाला. गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. गणेश आचार्य हे नाव चित्रपटप्रेमींच्या चांगलं परियचाचं आहे. त्यात कोरिओग्राफी असलेली चिकनी चमेली सारखी अनेक गाणी प्रचंड गाजली आहे. त्याशिवाय स्वामी (२००७) , मनी है तो हनी है (२००८) आणि एंजल (२०११) या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अलीकडे मराठी चित्रपटा्तील गाजलेल्या आला होळीचा सण लय भारी, तुझी चिमणी उडाली भूर्रर्र, डॅशिंग गोविंदा अशा गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता ते मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत. अनेक वर्षा पासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे. भिकारी हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 



Web Title: In the presence of Exclusive Big B, this movie is a muharut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.