​प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे यांचा ‘लग्न मुबारक’ प्रदर्शित होणार ११ मे ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 09:25 IST2018-04-03T03:55:33+5:302018-04-03T09:25:33+5:30

‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात ना? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. ...

Prayer Behre, 'Balasaheb Balagude' and 'Azad Kale' will be performed on May 11 | ​प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे यांचा ‘लग्न मुबारक’ प्रदर्शित होणार ११ मे ला

​प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे यांचा ‘लग्न मुबारक’ प्रदर्शित होणार ११ मे ला

ग्न मुबारक’ काय? गोंधळलात ना? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची.... लग्न मुबारक असे म्हणण्यामागे एक खास कारण आहे आणि हे कारण काय आहे याचे उत्तर प्रेक्षकांना येत्या ११ मे २०१८ रोजी अभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे.
आज समाजामध्ये धर्माचे, जातीपातीचे जे काय राजकारण खेळले जात असल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात. या गोष्टीवर ‘लग्न मुबारक’ हटके प्रेमकथेद्वारे भाष्य करतो. तसेच या सिनेमाला साई – पियुष यांचे संगीत असून त्यांनी संगीतबद्ध केलेले आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने डोक्यावर घेतले आहे. तसेच ट्रॉय अरिफ यांनी संगीत दिलेले एक रोमँटिक गाणे ऐकायला मिळणार आहे. ‘लग्न मुबारक’साठी अक्षय कर्डक यांनी गीतलेखन केले आहे.
चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ मधून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव अभिनयात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच एक संजय जाधव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूकदेखील खूप वेगळा आहे. लग्न मुबारक या चित्रपटात प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन भुषण वाणी यांनी केले आहे.
तगड्या स्टारकास्टचा हा लग्न मुबारक प्रेक्षकांना कसा वाटतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला कळेल. 

Also Read : संस्कृती बालगुडे करतेय व्हॅकेशन एन्जॉय,समोर आले Photo

Web Title: Prayer Behre, 'Balasaheb Balagude' and 'Azad Kale' will be performed on May 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.