प्रथमेश करतोय दोन चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 15:24 IST2016-11-11T15:19:38+5:302016-11-11T15:24:20+5:30
टाइमपास या चित्रपटातून प्रथमेश परब याने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले होते. या चित्रपटातील त्याची दगडूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ...
.jpg)
प्रथमेश करतोय दोन चित्रपट?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">टाइमपास या चित्रपटातून प्रथमेश परब याने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले होते. या चित्रपटातील त्याची दगडूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मला वेड लागले या गाण्याप्रमाणेच त्याची दगडू ही भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास या चित्रपटानंतर त्याची गाडी सुसाटच निघाली असल्याचे पाहायला मिळाले. टाइमपासनंतर प्रथमेशने बालकपालक, टाइमपास २, उर्फी, लालबागची राणी हे चित्रपट केले आहेत. लालबागची राणी या चित्रपटात तो अभिनेत्री वीना जामकर याच्यासोबत पाहायला मिळाला होता. त्याचा हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. लालबागची राणी या चित्रपटानंतर प्रथमेश काय करतो याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट असल्याचे समजत आहे. प्रथमेशचा लवकरच ३५ टक्के पास हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे कळतेय. काही महिन्यांपासून हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे मात्र अनेक अडचणींचा सामना या चित्रपटाला करावा लागत होता. पण अखेर या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला असल्याचे समजत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचे गिफ्ट असणार आहे. तसेच त्याच्याजवळ दोन चित्रपट असल्याचेदेखील कळत आहे. त्याचबरोबर त्याचा झिपऱ्या हा आगामी चित्रपटदेखील लवकरच येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. यापूर्वी प्रथमेशने चित्रपट, नाटक यामधूनदेखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच त्याने मध्यंतरी एक लघुपट दिग्दर्शित केल्याची चर्चादेखील रंगली होती.