Prashant Damleसंगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाल्यानंर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:50 IST2022-11-26T10:46:36+5:302022-11-26T10:50:16+5:30
रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झालाय.

Prashant Damleसंगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाल्यानंर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-...
मराठी रंगभूमी गाजवलेले नट असं म्हटलं तर आपल्या सर्वांसमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं. आजवर प्रशांत दामलेंनी बऱ्याच नाटकात काम केले आहे. मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे. नुकतेच प्रशांत दामलेंच्या गाजलेल्या नाटकाने म्हणजेच 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाने १२, ५०० प्रयोगाचा विक्रमी टप्पा पार केला आहे.
प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहते. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. प्रशांत दामले लिहितात, आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला.. असच प्रेम असु दे..
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कलाक्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं आहे.
रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपट, नाटकं करणारे प्रशांत दामले यांच्याकडे आज गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जातं.