प्रशांत दामले यांनी नाटयगृहांविषयी सोशलमीडियावर व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 12:34 IST2017-01-20T12:34:23+5:302017-01-20T12:34:23+5:30
मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांनी सोशलमीडियावर नाटयगृहांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नुकतेच सोशलमीडियावर नाशिक येथील महाकवी कालिदास ...
.jpg)
प्रशांत दामले यांनी नाटयगृहांविषयी सोशलमीडियावर व्यक्त केली नाराजी
राठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांनी सोशलमीडियावर नाटयगृहांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नुकतेच सोशलमीडियावर
नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिराच्या नाटयृहातील दुरवस्थेची काही फोटोज् सोशलमीडियावर अपलोड केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक पोस्टदेखील सोशलमीडियावर शेअर केली आहे. ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात, नाशिक महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास नाटयगृहातील भीषण वास्तव... कसा प्रयोग करणार? कसे येणार रसिक? कसं रंगणार नाटक? गेली अनेक वर्ष नाटक करूनही ही हीच अवस्था...त्यांच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी सहमती दर्शवली. तसेच दरम्यान प्रशांत दामलेंच्या या फेसबूक पोस्टला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबूकवरुन उत्तर दिलं आहे. राज्यातील इतरही नाट्यगृहांची अशीच दुरावस्था आहे. मात्र आमच्यावरचं टीका का केली जाते? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे. यावरदेखील प्रशांत दामले आपल्या कमेंन्टच्या माध्यमातून सांगतात की, मनसेच्या सर्व कार्यकत्यार्ना मला सांगावेसे वाटते की माझा रोख मनसेकड़े नाही तर प्रशासनाकडे आहे. नवीन संकल्पना चित्र अप्रतिम आहे याबद्दल वादच नाही. ते होईल तेव्हा होईलच. पण माझ म्हणण एवढच आहे तोपर्यंत आत्ता अस्तिवात असलेल्या वास्तुची प्रशासनाने योग्य ती निगा राखावी एवढीच रास्त अपेक्षा कलाकारांची व रसिकांची आहे ह्याची प्रशासनाने नोंद घ्यावी. तसेच काही महिन्यांपूर्वीदेखील अभिनेता सुमित राघवन याने नाटयगृहांची बिकट परिस्थिती सोशलमीडियावर शेअर केली होती. यावेळीदेखील नाटयगृहांच्या या परिस्थितीबाबत चित्रपटसृष्टीतून आवाज उठविण्यात आला होता. आता मात्र ही महाराष्ट्रातील नाटयृह कधी सुधारणार याच प्रतिक्षेत रसिक असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे.