अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कायमची सोडली मुंबई, कारण सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:10 AM2024-04-16T11:10:27+5:302024-04-16T11:11:42+5:30

पार्थना बेहरे ही मुंबई बाहेर निसर्गाच्या सानिध्यात कायमची राहायला गेली आहे.

Prarthana Behere Shifts To Alibaug Tells About Her Experience After Leaving Mumbai | अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कायमची सोडली मुंबई, कारण सांगत म्हणाली...

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कायमची सोडली मुंबई, कारण सांगत म्हणाली...

विविध चित्रपट, मालिका यांमधून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रार्थनाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिच्या कामाबद्दल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना वरचेवर अपडेट्स देत असते. पण ही अभिनेत्री मुंबई सोडून महाराष्ट्राच्या दुसऱ्या शहरात राहायला गेली आहे. आता अखेर तिनं मुंबई सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

पार्थना बेहरेनं नुकतंच सुलेखा तळवलकरांच्या 'दिल के करीब' सेगमेंटमध्ये मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.  मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? यावर ती म्हणाली, 'करोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. ती जागा अभिच्या आजोबांची आहे. त्यानंतर रो-रो बोट सुरू करण्यात आली. यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचायचा. या सगळ्याचा आम्ही विचार केला. याशिवाय त्याठिकाणी आम्ही घोडे, गायी, कुत्रे असं सगळं पाळलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी अभिला सतत अलिबागला जावं लागायचं.  त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळेच शिफ्ट होऊया'.

अभिनेत्री पुढे म्हणते, मालिका सुरू होती तेव्हा मी जुहूला राहायचे. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मज्जा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. यामुळे स्वत:ला कुठेतरी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं वाटलं. अलिबागलामध्ये मी माझी पेटिंगची आवड जपते, सगळीकडे मेकअपशिवाय फिरते, झाडांची वगैरे काळजी घेते. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. यामुळेच आम्ही कायमस्वरुपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

पुढे ती म्हणाली, 'मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले. त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. प्रवासाच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होईल हे आम्हाला माहिती होतं. पण, आता सवय झालीये. आता काहीच वाटत नाही. आम्हाला मे महिन्यात अलिबागला शिफ्ट होऊन एक वर्ष पूर्ण होईल', असं प्रार्थना बेहेरेने सांगितलं.

Web Title: Prarthana Behere Shifts To Alibaug Tells About Her Experience After Leaving Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.