प्रार्थना बेहरेचा नो मेकअप लूकमधील फोटो होतोय व्हायरल, दिसतेय खूपच क्युट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 16:37 IST2021-02-19T16:33:44+5:302021-02-19T16:37:21+5:30
Prarthana behera looks very cute in no makeup look :प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.

प्रार्थना बेहरेचा नो मेकअप लूकमधील फोटो होतोय व्हायरल, दिसतेय खूपच क्युट
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना सतत आपलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. प्रार्थनाने तिचा नो मेकअप लूकमधला फोटो शेअर केला आहे. यात ती खूप क्युट दिसतेय. प्रार्थानाने शेअर केलेला हा ब्लॅक अँड व्हाईट चाहत्यांना खूप आवडला आहे. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.
प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात तिने काम केलं आहे.