रायरंद चित्रपटातून बहुरूपी व बालमजुरीवर यांच्या जीवनावर प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 10:50 IST2017-01-27T05:20:24+5:302017-01-27T10:50:24+5:30

लहान मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी पण त्यांना मजबुरीमुळे काम करावे लागते. आता याच बालमजुरीवर आणि बहुरूपी ...

Prakash on the life of Rairanda from the film, on polymorphic and child labor | रायरंद चित्रपटातून बहुरूपी व बालमजुरीवर यांच्या जीवनावर प्रकाश

रायरंद चित्रपटातून बहुरूपी व बालमजुरीवर यांच्या जीवनावर प्रकाश

ान मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी पण त्यांना मजबुरीमुळे काम करावे लागते. आता याच बालमजुरीवर आणि बहुरूपी यांच्या जीवनावर लवकरच एका आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. रायरंद असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाला पुणे फिल्म फेस्टीवलमध्ये बहुमान मिळाला आहे.

     या चित्रपटाच्या यशाबाबत लेखक आशिष निनगुरकर सांगतात, मुंबईत काम करतांना सर्वांचे पाठबळ मोठे वाटते . मी लिहिलेल्या खास या चित्रपटाचा  शो पुण्यात झाला याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही.त्यात आमच्या चित्रपटाचा विषय सामाजिक असल्याने तो रसिकांना वस्तुंस्थितीचे भान देईल.भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल तर सामाजिक आशय मांडणाºया  चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे.मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत पोचवता येतो.त्यामुळे बालमजुरीसारखा गंभीर विषय 'रायरंद' चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

        कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य 'रायरंद'ची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता आनंद वाघ हा खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश ननावरे यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच टोरंटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये पाठविण्यात येणार आहे.  या चित्रपटात अनंत जोग,रणजित कांबळे,श्यामकुमार श्रीवास्तव,आशिष निनगुरकर,करणं कदम,आनंद वाघ,अजित पवार,प्रवीण भाबळ,सुनील जैन,सुरेश दाभाडे,रेखा निर्मळ,गोरख पठारे,झाकीर खान,राजू ईश्वरकट्टी,नाना शिंदे,संतोष चोरडीया,स्वप्नील निंबाळकर,फिरोज खान,सुभाष कदम व अनुराग निनगुरकर  आदींच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे असून  कॅमेरामन राजेश वाव्हळ,कलादिग्दर्शक सुभाष कदम,संगीतकार विकास जोशी,कार्यकारी निर्माते भावेश लोंढे व सहकारी अमेय शेणवी व प्रतिश सोनवणे असून संकलक व पोस्ट प्रॉडक्शन हेड अजित देवळे आहेत.

Web Title: Prakash on the life of Rairanda from the film, on polymorphic and child labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.