प्राजक्ता आणि सिध्दार्थ 'टाफेटा' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 21:31 IST2016-02-25T04:31:39+5:302016-02-24T21:31:39+5:30
मराठी प्रेक्षकांच्या भेटीस नवीन जोडी येत आहे. काय... विचारात पडलात ना.. अहो दुसरे तिसरे कोणी नसून ते तर आपल्या ...

प्राजक्ता आणि सिध्दार्थ 'टाफेटा' मध्ये
म ाठी प्रेक्षकांच्या भेटीस नवीन जोडी येत आहे. काय... विचारात पडलात ना.. अहो दुसरे तिसरे कोणी नसून ते तर आपल्या सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर व जुळून येतील रेशीमघाटी या मालिकेतील मेघना म्हणजेच प्राजक्ता माळी या दोघांची जोडी आता रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालण्यासाठी येत आहे. सचिन व संजय पारेकर दिग्दर्शित 'टाफेटा' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाच्या शीर्षकाचे अनावरण वर्षा उसगावंकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेमकथेतून नात्यांचा उलगडत जाणारा अर्थ व त्यातून निर्माण होणाºया भावनिक बंधावर भाष्य करणारा हा चित्रपट असणारआहे. सिध्दार्थ व प्राजक्ता समवेत अभिजीत खांडेकर देखील झळकणार आहे.