दमलेल्या बाबाची कहाणी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 14:22 IST2016-06-05T08:52:13+5:302016-06-05T14:22:13+5:30
दमलेल्या बाबाची कहाणी ह्या सामाजिक-कौटुंबिक चित्रपटाचे निमार्ते म्हणून नाना पेठेतील विशाल धनवडे यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांच्या ...

दमलेल्या बाबाची कहाणी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
द लेल्या बाबाची कहाणी ह्या सामाजिक-कौटुंबिक चित्रपटाचे निमार्ते म्हणून नाना पेठेतील विशाल धनवडे यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांच्या ह्या चित्रपटाच्या मुहूतार्चं चित्रीकरण बाप्पाच्याच चरणी झालं आहे. श्री गजाननाच्या कृपेने येत्या २४ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आता ह्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवातही पुण्यातल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीच्या महाआरतीने करण्यात आली. तसेच यावेळी चित्रपटाचे पोस्टर देखील लॉन्च करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निमार्ते विशाल धनवडे, चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन चव्हाण व योगेश जाधव, चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील प्रसिद्ध कवी आणि अभिनेता संदीप खरे, अभिनेत्री दिप्ती भागवत, बाल अभिनेत्री श्रीया पासलकर उपस्थित होते.