लाख सम्भालो पागल दिल को दिल धड़के ही जाये म्हणत पूजा सावंत शेअर केलं फोटोशूट, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 07:00 AM2021-03-23T07:00:00+5:302021-03-23T07:00:02+5:30

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pooja sawant share her saree photoshoot on instagram | लाख सम्भालो पागल दिल को दिल धड़के ही जाये म्हणत पूजा सावंत शेअर केलं फोटोशूट, चाहते झाले घायाळ

लाख सम्भालो पागल दिल को दिल धड़के ही जाये म्हणत पूजा सावंत शेअर केलं फोटोशूट, चाहते झाले घायाळ

googlenewsNext

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. अलीकडेच पूजाने तिचे गुलाबी रंगाच्या साडीतलं फोटोशूट शेअर केला आहे. साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. लाख सम्भालो पागल दिल को दिल धड़के ही जाये........असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी फोटोवर लाईक्ल आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.

Web Title: Pooja sawant share her saree photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.