हया गोजिरवाण्या घरात रंगभूमीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 10:36 IST2016-12-20T10:36:48+5:302016-12-20T10:36:48+5:30
सध्या मराठी चित्रपटसृष्ट्रीत नाटकांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटांप्रमाणेच नाटकालादेखील चांगले दिवस आले असल्याचे दिसत ...

हया गोजिरवाण्या घरात रंगभूमीवर
स ्या मराठी चित्रपटसृष्ट्रीत नाटकांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटांप्रमाणेच नाटकालादेखील चांगले दिवस आले असल्याचे दिसत आहेत. एवढेच नाही तर प्रेक्षकांचे आपले लाडके कलाकारदेखील नाटकाच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे. सुयश टिळक, प्राजक्ता माळी, सौरभ गोखले, अमेय वाघ, सखी गोखले असे अनेक कलाकार नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर अभिनय करत असल्याचे दिसत आहेत. तसेच प्रेक्षकांचेदेखील या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. नाटकाचे हे प्रेम पाहता आता लवकरच रंगभूमीवर हया गोजिरवाण्या घरात हे नवीन नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वेद प्रोडक्शन निर्मित आणि मुक्तायन प्रस्तुत हे कौटुंबिक नाटक असणार आहे. मानस लयाळ लिखित या नाटकामध्ये सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार हया गोजिरवाण्या घरात या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. अंकुर काकतकर दिग्दर्शित हे नाटक असणार आहे. गोपाल अलगेरी आणि तनुजा कुलकर्णी या नाटकाचे निमार्ते असून, योगिता औरादकर या सहनिर्मात्या आहेत. नवरा, बायको आणि आई असे तिघांचे दृष्ट लागेल असा संसार या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला हवी असलेली स्वत:ची स्पेस आणि त्यामुळे वाढणारा नात्यातला गोडवा या नाटकाचा प्रमुख भाग आहे. असे सारे काही आलबेल, गोंडस आणि गोजीरवाणे असतानाच या तिघांपैकी एकाच्या आयुष्यात अघटीत घडते, अनपेक्षित झालेल्या या आघाताचा परिणाम तिघांच्या जीवनावर आणि स्वाभाविकत: घरावर देखील होतो, अशावेळी हे कुटुंब स्वत:ला कसे सावरते, हे सारे काही या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून अभिराम म्हणजेच साईकीत कामत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. तर माज्या नवºयाची बायको या मालिकेतून अदिती अभिनय करताना दिसून येत आहे. सुप्रिया पाठारे यांनीदेखील अनेक मालिकेतून आणि चित्रपटातून आपल्या अभिनायची छाप उमटविली आहे. हया गोजिरवाण्या घरात या नाटकाच्या दौ-याला २७ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे.