फुलवा खामकर सांगते, या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 12:25 IST2017-01-16T12:25:28+5:302017-01-16T12:25:28+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना ...
.jpg)
फुलवा खामकर सांगते, या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान
प णे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना अनेक भाषेतील चित्रपटांची मेजवानीच मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच या महोत्सवात घुमा हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाला या महोत्सवात चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपली मुलं ही इंग्रजी शाळेतच शिकली पाहिजे अशी हल्लीच्या पालकांची जिद्द असते. यामध्ये पालक स्वत:ची ओढाताण करून आपल्या पाल्याचे होणारे हे शिक्षण सामाजिक समस्या होऊ पाहत आहे. याचा अनुभव घेऊनच सामाजिक जाणिवेतून शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाºया 'घुमा' हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान वाटत असल्याचे प्रेक्षकांची लाडकी कोरिओग्राफर फुलवा खामकर हिने लोकमत सीएनएक्सला सांगितले. फुलवा सांगते, हो, कारण या चित्रपटात मी कोरिओग्राफी केलेली एक झक्कास लावणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या महिन्यात या लावणीचे चित्रिकरण करण्यात आले आहे. यानंतर ही लावणी लगेच या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अत्यंत सुंदर अशी लावणी आहे. त्याचा बाजदेखील कडक आहे. प्रेक्षकांना नक्कीच ही लावणी आवडेल. या चित्रपटामध्ये ही लावणी ओढून ताणून बसविली नाही. या लावणीला गुरू ठाकूर यांचे शब्द असून, प्रियांका बर्वे हिने आवाज दिला आहे. तर जसराज याचे संगीत आहे. महेश काळे दिग्दर्शित घुमा हा चित्रपट खरचं खूप छान आहे. या चित्रपटाच्या टीमसोबत काम करताना खूप छान अनुभव मिळाला. आपल्या मातीतील हा चित्रपट आहे. तसेच खरचं समाजाचे प्रतिबिंब दाखविणार हा चित्रपट आहे.