फँटम फिल्म्सने ‘यंगराड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये केला प्रवेश, ६ जुलैला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 13:56 IST2018-05-11T08:26:05+5:302018-05-11T13:56:05+5:30

फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था एकत्रित आल्या असून त्या ‘यंगराड’ या मराठी चित्रपटाची निर्मिती ...

Phantom Films will be making Marathi film production through the film 'Yangrad', will be available on July 6 | फँटम फिल्म्सने ‘यंगराड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये केला प्रवेश, ६ जुलैला होणार प्रदर्शित

फँटम फिल्म्सने ‘यंगराड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मितीमध्ये केला प्रवेश, ६ जुलैला होणार प्रदर्शित

टम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था एकत्रित आल्या असून त्या ‘यंगराड’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत.चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ६ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून त्यात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यावर्ती भूमिका आहेत.‘यंगराड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो.एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात.त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्याचच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वाचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

 

“यंगराड’ ही कुमारवयातील चौघांची कथा आहे.  ही कथा त्या सहज परिणाम होईल अशा वयातील मैत्री, निष्पापपणा, प्रेम, कुटुंब आणि मुल्ये यांचे महत्व अधोरेखित करते. या कथेतून प्रेक्षकांना स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात काही धडे घेण्याची व त्याप्रमाणे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते कोणत्या कुटुंबातून किंवा पार्श्वभूमी घेऊन येतात, त्यांचे वय काय आहे याचा कोणताही परिणाम त्यावर होत नाही. आपली एखाद्या गोष्टीत चूक नसते, पण आपण ती सुधारण्यासाठी काय करतो त्यातून आपली ओळख बनत जाते, ही बाव कथेतून अधोरेखित होते,” असे उद्गार निर्माता विठ्ठल पाटील यांनी काढले आहेत.‘यंगराड’च्या माध्यमातून फँटम फिल्म्सने मराठी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या कंपनीची स्थापना अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मंटेना या देशातील चार सर्जनशील युवकांनी एकत्र येवून केली आहे. फँटमने सर्जनशील उर्जेला बढावा देत चिरकालीन व मनोरंजनात्मक कॉन्टेंट देण्यावर भर दिला आहे.

 

“यंगराड’च्या माध्यमातून मराठी प्रादेशिक भाषा क्षेत्रात प्रवेश करत असल्याचा आम्हाला अतिव आनंद आहे. ही चार अशा युवकांची कथा आहे, की ते स्वत्वाचा शोध घेण्यासाठी एकमेकांची साथ सोडतात. मराठी चित्रपटात कथा खूपच दमदार असतात आणि ही दमदार कथानके उलगडण्यासाठी भक्कम अशी अभिनेत्यांची फळी येथे उपलब्ध आहे. हे सर्व आमच्या प्रेक्षकांना देताना आम्हाला खूपच अभिमान वाटतो आहे,” असे उद्गार मधु मंटेना यांनी काढले. “निर्मितीपश्चात आणि सेटवरील सेवा साधारण एक दशकभर पुरविल्यानंतर फ्युचरवर्क्स ही कंपनी आता पहिल्यांदाच चित्रपटनिर्मितीमध्ये उतरत असून ‘यंगराड’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सच्या सहकार्यातून ही निर्मिती होत आहे,” असे उद्गार फ्युचरवर्क्स मीडियाचे गौतम गुप्ता यांनी काढले.

 

चित्रपटात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, जीवन कराळकर, विठ्ठल पाटील, शंतनू गणगणे, सविता प्रभुणे आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाचे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे.दमदारपणा, ऊर्जा आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा या वैशिष्ट्यांनी चित्रपट नटला असून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल एवढे निश्चित. ही भव्य अशी कथा ६ जुलै २०१८ रोजी पडद्यावर सकारात आहे.



फँटम फिल्म्स ही भारतातील पहिली ‘दिग्दर्शकांची कंपनी’ आहे. तिची स्थापना अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मंटेना या देशातील चार सर्जनशील युवकांनी एकत्र येवून २०११ साली केली. फँटमने सर्जनशील ऊर्जेला बढावा देत चिरकालीन व मनोरंजनात्मक कॉन्टेंट देण्यावर भर दिला आहे. कंपनीच्या गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत तिने १४ चित्रपट प्रदर्शित केले असून त्यांत लुटेरा, हसी तो फँसी, क्वीन, अगली, एनएच१०, बॉम्बे वेल्वेट, मसाण, उडता पंजाब, रामण राघव, २.०, ट्रॅप्ड, मुक्काबाज आदी चित्रपटांचा समावेश आहे. बॉक्स ऑफीसवरील अनेक यशस्वी चित्रपटांबरोबरच त्यांच्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन कान्स चित्रपट महोत्सवात झाले होते. त्यांत या चित्रपटांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.फँटम पहिली ‘नेटफिक्स ओरीजीनल’ मालिकेची निर्मिती करत असून ही मालिका भारतातून तयार होणार आहे. कंपनीने ब्लुमहाऊस प्रॉडक्शन्स  आणि इव्हान्हो पिक्चर्सबरोबर सहकार्य करार केला आहे. त्यातून जागतिक बाजारपेठेसाठी हॉरर चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे.

 
२००७साली स्थापना झालेली फ्युचरवर्क्स मीडिया लिमिटेड ही भारतातील एक निर्मितीपश्चात प्रक्रिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. तिला एमपीएए आणि इतर महत्वाच्या स्टुडीओंनी प्रमाणित केले आहे. कंपनीला ७० हूनही अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याचे जाळे आहे. त्यांत बालाजी मोशन पिक्चर्स, धर्म प्रॉडक्शन्स, डीज्ने युटीव्ही, फोक्स स्टार, अॅमॅझॉन, नेटफिक्स आदि आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. फ्युचरवर्क्सने सर्व चित्रपट, टीव्ही आणि वेबनिर्मिती गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्याची आपली क्षमता स्थापित केली आहे.

 

कंपनीने मुंबई आणि चेन्नईमध्ये स्वतःच्या आधुनिक अशा सुविधा स्थापित केल्या असून त्यांना आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांचे नेतृत्व लाभले आहे. व्हीएफएक्स, डीआय/कलर आणि ध्वनी या क्षेत्रांमध्ये फ्युचरवर्क्स आपल्या सेवा देते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असलेली आणि ग्राहकांना सर्वोत्तम निर्मितीपाश्चात सेवा देणारी ही कंपनी भारतात निर्मितीपश्चात एचडीआर ग्रेडिंग आणि मास्टरिंग सुविधा देणारी पहिली भारतीय कंपनी आहे. नेटफिक्स आणि अॅमॅझॉनसारख्या स्ट्रीमिंग व्यासपीठाच्या माध्यमातून कॉन्टेंटचे डीजीटायजेशन आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगमधील नवनवीन मानके स्थापित केली जात असून त्या माध्यमातून फ्युचरवर्क्स तंत्रज्ञानातील सुधारणेच्या बाबतीत आपल्या स्पर्धकांवर मात करते. निर्मितीपश्च्यात आणि सेटवरील सेवा कंपनी गेल्या एक दशकाहूनही अधिक काळ पुरवीत आली असून ती आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे. फ्युचरवर्क्स मीडिया लिमिटेड ‘यंगराड’च्या माध्यमातून विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सच्या सहकार्यातून हा प्रवेश करत आहे.

 
‘यंगराड’ हे विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सचा संयुक्त निर्मिती असलेला दुसरा चित्रपट आहे. याआधी विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सने ‘रिंगण’ या मराठी चित्रपाटाची संयुक्त निर्मिती केली होती. चित्रपटाने ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. त्याशिवाय, ‘रिंगण’ने ५३व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ पुरस्कार पटकावले. त्यांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायालेखन, सर्वोत्कृष्ट बालकलाकार अशा पुरस्कारांचा समावेश आहे.कर्जामध्ये बुडलेल्या एका शेतकऱ्याची हृदयद्रावक कथा आणि सात वर्षाच्या एका मुलाची त्याच्या मृत आईच्या शोधाची कथा सादर केल्यानंतर कंपनी ‘यंगराड’ ही आणखी अशीच एक हृदयाला भिडणारी कथा घेऊन येत आहे. चार कुमारवयीन युवकांची ही कथा त्यांच्या चुकांमधून ते आयुष्याचे धडे कसे गिरवीत जातात यावार आधारित याविषयीची आहे.

Web Title: Phantom Films will be making Marathi film production through the film 'Yangrad', will be available on July 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.