साखरपुड्यातही फिल्मी झाला परबांचा दगडू; क्षितीजासाठी केला रोमँटिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:41 AM2024-02-16T09:41:57+5:302024-02-16T09:42:55+5:30

प्रथमेश परब-क्षितीजाचा रोमँटिक डान्स, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल

parthmesh parab romantic dance for kshitija in engagement ceremony video viral | साखरपुड्यातही फिल्मी झाला परबांचा दगडू; क्षितीजासाठी केला रोमँटिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

साखरपुड्यातही फिल्मी झाला परबांचा दगडू; क्षितीजासाठी केला रोमँटिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. प्रथमेशची सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रथमेशने नुकताच गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर साखरपुडा केला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रथमेश आणि क्षितीजाने व्हॅलेंटाइन डेचा मुहुर्त साधत साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

प्रथमेश आणि क्षितीजाच्या साखरपुड्यातील काही खास क्षणांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतला. साखरपुड्यात प्रथमेशचा फिल्मी अंदाजही पाहायला मिळाला. प्रथमेशने क्षितीजासाठी खास रोमँटिक अंदाजात डान्स केला. शाहरुख खानच्या रंग दे तू मोहे गेरूआ गाण्यावर प्रथमेश आणि क्षितीजा थिरकले. याचा व्हिडिओ प्रथमेशने शेअर केला आहे. "कारण खऱ्या आयुष्यातही थोडं फिल्मी होणं गरजेचं आहे," असं कॅप्शन प्रथमेशने या व्हिडिओला दिलं आहे. 

दरम्यान, प्रथमेश आणि क्षितीजा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितीजा विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 

Web Title: parthmesh parab romantic dance for kshitija in engagement ceremony video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.