पल्लवी-संग्राम अडकले लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 18:02 IST2016-12-01T18:02:51+5:302016-12-01T18:02:51+5:30

अभिनेत्री पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. संग्राम आणि पल्लवीने नुकताच साखरपुडा केला होता. ...

Pallavi-Sangram got trapped in marriage | पल्लवी-संग्राम अडकले लग्नबंधनात

पल्लवी-संग्राम अडकले लग्नबंधनात

िनेत्री पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. संग्राम आणि पल्लवीने नुकताच साखरपुडा केला होता. आता हे दोघेही कायमचे एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आता लगीनघाई सुरु असल्याचे म्हणम्यास खरेतर काही हरकत नाही. एका मागो माग एक असे सर्वच कलाकार सध्या झपाट्यात लग्न करु लागले आहेत. संग्राम आणि पल्लवीने अगदी पारंपारिक रिती रिवाजाने लग्न केले आहे. पिवळ््या रंगाची सुंदर साडी, नाकातच नथ. चंद्रकोर, डोक्याला मुंडावळ््या अश रुपात सजलेली पल्लवी अतिशय सुंदर दिसत होती. अभिनेत्री समीधा गुरु देखील पल्लवी आणि संग्रामच्या लग्नाला उपस्थित होती. नुकतेच यांच्या लग्नाची बातमी अभिजीत गुरू यांनी फेसबूक या सोशल नेटवर्किंग साइटवरून दिली आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हे नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मेहनत करत असतात आणि रसिक प्रेक्षक त्यांच्या मेहनतीला मनापासून दाद देतात. चित्रपट, मालिका, नाटक यांच्यासह प्रेक्षकांना आवडते ते म्हणजे कलाकारांची जोडी. मग ती जोडी रिल लाईफ मधील असो किंवा रिअल लाईफ मधील. मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री रुंजी म्हणजेच अभिनेत्री  पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ यांनी मात्र रिअल लाईफमध्ये एकमेकांची साथ देण्याचे ठरविले आहे.  स्टार प्रवाह वाहिनीवरील रुंजी मालिकेतील पल्लवी आणि पुढचं पाऊल मालिकेतील संग्राम या कलाकारांचा चाहता वर्ग फार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडणार आहे हे मात्र नक्की. या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी खुप साºया शुभेच्छा.

Web Title: Pallavi-Sangram got trapped in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.