यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 13:40 IST2017-01-13T13:40:26+5:302017-01-13T13:40:26+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहकायार्ने, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ...

Organizing Yashwant International Film Festival | यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

वंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहकायार्ने, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव २० जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला असल्याचे  संचालक डॉ जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या महोत्सवाचे उदघाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, आस्थापना व्यवस्थापक संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
     
         यंदा या महोत्सवात ५२ जागतिक, ३ भारतीय, ३ मराठी, ४ रेट्रो, ७ लैटीन अमेरिका या भाषेतील सिनेमे आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २९ लघुपट यामध्ये १३ चलचित्र तर १६ अनिमेशन आहे. यावर्षी व्हिएतनाम देशाचे ५ सिनेमे देखील दाखविण्यात येणार आहेत. असे महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले.
       
           प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे सांगतात,यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. यावेळी महोत्सवास मुंबई विद्यापिठाचे सहकार्य लाभणार आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे उदघाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.  यंदाच्या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण ७५ सिनेमे दाखवले जाणार आहेत. यावर्षी स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मास्टर क्लास या विभागात चिली देशातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जॉर्ज अरिगडा हे ैध्वनी आणि संगीत या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
          

Web Title: Organizing Yashwant International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.