हे राम नथुराम या नाटकाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 14:57 IST2016-12-19T14:55:10+5:302016-12-19T14:57:16+5:30
कोल्हापूरमध्ये हे राम नथुराम या नाटकाच्या प्रयोगाला विरोध करण्यात आला. हे नाटक मराठी चित्रपटसृष्ट्रीतील अभिनेते शरद पोंक्षे यांचे आहे. ...

हे राम नथुराम या नाटकाला विरोध
क ल्हापूरमध्ये हे राम नथुराम या नाटकाच्या प्रयोगाला विरोध करण्यात आला. हे नाटक मराठी चित्रपटसृष्ट्रीतील अभिनेते शरद पोंक्षे यांचे आहे. मात्र या नाटकाला नितेश राणेंची स्वाभिमानी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने होणारा प्रयोग बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाºयास या नाटकामध्ये देशभक्त दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग कोल्हापुरच्या थिएटरमध्ये कदापी होऊ देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या मध्यवर्ती भुमिकेत असलेल्या स्वत: शरद पोंक्षे यांच्या लेखणीतून व दिग्दर्शनातून हे नाटक साकारलेले आहे. इतिहासाच्या अगदी जवळ जाणारं हे नाटक गांधी हत्या केसमधील कोर्टातलं खरखूरं निवेदन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तसेच या नाटकाचे खास वैशिष्टय नाटकाच्या शेवटी हसत हसत फासाच्या घटनेचा थरारक अनुभवही प्रेक्षकांना रंगमंचावर पहायला मिळणार आहे. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहात हे राम नथुराम या नाटकाच्या प्रयोगास पालिकेने परवानगी दिली आहे. विरोधानंतरही नाटकाचा प्रयोग यशस्वी झाल्यास काँग्रेस कमिटीच्या कार्यलयाबाहेर आणि महापौरांच्या दालनात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही यावेळी संभाजी ब्रिगेडने दिला आहे. तसेच कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे परवानगी दिली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे अभिषेक मिठारी यांनी केला आहे. शरद पोंक्षे यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच त्यांचा आगामी मनमर्जिया हा चित्रपटदेखील येत असल्याचे कळत आहे.