बाबो...! मोनालिसा बागलचा 'करंट', सिनेमाच्या पोस्टरवरील बॅकलेस फोटोने माजवली खळबळ

By तेजल गावडे | Published: November 9, 2020 10:48 AM2020-11-09T10:48:14+5:302020-11-09T10:48:44+5:30

'करंट' या चित्रपटाच्या पोस्टरवरील मोनालिसाच्या बॅकलेस फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

OMG...! Monalisa Bagal's 'Current', a backless photo on a movie poster | बाबो...! मोनालिसा बागलचा 'करंट', सिनेमाच्या पोस्टरवरील बॅकलेस फोटोने माजवली खळबळ

बाबो...! मोनालिसा बागलचा 'करंट', सिनेमाच्या पोस्टरवरील बॅकलेस फोटोने माजवली खळबळ

googlenewsNext

'झाला बोभाटा' आणि आगामी 'भिरकीट' या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुप जगदाळे नवा चित्रपट घेऊन येत आहेत. अभिनेत्री मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका असलेला 'करंट' हा चित्रपट २१ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

'करंट' या चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरवर मोनालिसा बॅकलेस फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार अशी टॅगलाईन या टीझर पोस्टरवर आहे. त्यामुळे हा चित्रपट 'हॉट' असण्याचा अंदाज बांधता येतो.

रेहा फिल्म प्रॉडक्शनच्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी 'करंट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. "झाला बोभाटा" हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट होता. त्यामुळे 'करंट' या चित्रपटातूनही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानीच मिळेल यात शंका नाही.

सिनेमा करताना आम्ही दोनच नियम पाळतो,आमचा  सिनेमा मनोरंजन करणारा असतो आणि पहिला नियम मी कधीच विसरत नसतो असे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले.

चित्रपटातील स्टारकास्ट आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि निर्मात्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी सांगितलं. करंट चित्रपटाचा पोस्टर पाहून नेमके या चित्रपटाचे कथानक काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: OMG...! Monalisa Bagal's 'Current', a backless photo on a movie poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.