रमेश देव आणि सीमा देव यांच्या नृत्याच्या प्रेमात पडले प्रेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 11:31 IST2017-01-14T11:31:36+5:302017-01-14T11:31:36+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरूवातीलाच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या महोत्सवाचे पिंपरी चिंचवड येथे नुकतेच उद्घाटन पार ...

रमेश देव आणि सीमा देव यांच्या नृत्याच्या प्रेमात पडले प्रेक्षक
प णे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरूवातीलाच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या महोत्सवाचे पिंपरी चिंचवड येथे नुकतेच उद्घाटन पार पडले. मात्र उद्घाटन सोहळयाला चॉंद लागले ते रमेश देव आणि सीमा देव यांनी केलेल्या नृत्याने. या गोड जोडप्याने ज्यावेळी नृत्याचा ठेका धरला त्यावेळी प्रेक्षकांमधून टाळयांचा कडकडाट झाला. तसेच या जोडप्याचे नृत्य क्लिक करण्यासाठी प्रेक्षकांचे मोबाईलदेखील पुढे सरसावले. प्रेक्षकांमधून एकच जल्लोष झाला. या सोहळयाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड येथील अॅडलॅब्ज येथील चित्रपटगृहात करण्यात आले. याच महोत्सवात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सीमा देव यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या महोत्सवाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच पिंपरी चिंचवड येथील उद्घाटनपूर्वी रमेश देव आणि सीमा देव यांच्या हस्ते पुणे येथील कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृह परिसरातील पिफ बझारचेही उद्घाटन करण्यात आले. यावेली सीमी देव यांनी सुवासिनी , जगाच्या पाठीवर या गाजलेल्या चित्रपटांचे अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, ज्येष्ठ दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे अभिनयातील इतक्या बारीकसारीक गोष्टी समजावून सांगायचे की, त्यांच्यासमोर मला जमत नाही असे म्हणणे फार अवघड व्हायचे. त्यांनी घेतलेल्या या तालमींमुळेच माझा अभिनय परिपूर्ण होऊ शकला आणि मराठीप्रमाणेच हिंदीतही मला अनेक चित्रपटांत कामे मिळाली. राजा परांजपे यांच्यासह राजा ठाकूर आणि मधुकर ऊर्फ बाबा पाठक या दिग्दर्शकांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतीच्या अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, संजीव कुमार यांच्यासारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते. पण त्यांनी जेव्हा मी तुमचा फॅन आहे असे सांगितले तेव्हा खूप हायसे वाटले! राजेश खन्ना देखील गिरगावातील असल्यामुळे त्यांच्याबरोबर अतिशय मोकळेपणाने काम करता आले. तसेच आताचे मराठी चित्रपट नक्कीच आशयसंपन्न आहेत, असे त्या म्हणाल्या. नवोदित मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाय टाकण्यापूर्वी पुरेशी तयारी करून जावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.