अभ्यासू निर्मात्यांची संख्या वाढली पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:33 IST2016-01-16T01:12:43+5:302016-02-06T10:33:38+5:30
सर्वच चित्रपट सगळ्याच प्रेक्षकांना आवडणे शक्यच नाही. कारण काही चित्रपटांचा क्लास हा ठरलेला आहे. अस्तु, किल्ला, कोर्ट हे चित्रपट ...

अभ्यासू निर्मात्यांची संख्या वाढली पाहिजे
स ्वच चित्रपट सगळ्याच प्रेक्षकांना आवडणे शक्यच नाही. कारण काही चित्रपटांचा क्लास हा ठरलेला आहे. अस्तु, किल्ला, कोर्ट हे चित्रपट विशिष्ट वगार्साठीच बनवले गेले आहेत, त्यामुळे केवळ मनोरंजन म्हणून पहायला आवडणाºया प्रेक्षकांना ते चित्रपट पसंतीस न पडणं हे स्वाभाविक आहे. कारण केवळ मनोरंजानसाठी येणार्या प्रेक्षकांना कठसोबतच त्यातील कलाकारही तितकेच कदाचित त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. मात्र म्हणून कोर्टसारखे ते चित्रपट वाईट आहेत असे म्हणणे चुकीचेच आहेत. त्यामुळे प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग ठरलेला आहे असं मला वाटतं. मराठी चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचला आहे ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. कारण मराठी चित्रपटांचे निमार्ते केवळ पैसा कमवण्याच्या हेतूने चित्रपट काढत नाहीयेत. आज त्यांचाही जाणकार निमार्ता म्हणून चित्रपटाचा सखोल अभ्यास आहे. माझा चित्रपट लोकांनी का पाहायाला यावं, हा प्रश्न ते पहिल्यांदा स्वत:ला विचारतात. असे अभ्यासू आणि प्रेक्षकांचा विचार करून चित्रपट तयार करणार्या निर्मात्यांची संख्या अजून वाढायला पाहिजे. तसा दिसायला हा सर्वसाधारणच अभिनेता, पण त्याचे रांगडे रूप, अभिनयाबद्दलची तळमळ आणि प्रत्येक नाटक, चित्रपट असो वा मालिकेत केलेल्या दमदार अभिनयाने त्याने केवळ तरुणवर्गालाच नाही तर तमाम प्रेक्षकवर्गाला आपलेसे केले. 2004 मध्ये वैग या मालिकेतून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने किमयागार ऊन पाऊस, वादळवाट, या गोजिरवाण्या घरात, बेधुंद मनाची लहर या मालिकेत तर सुख म्हणजे नक्की काय असतं व आणि मकरंद राजाध्यक्ष या नाटकात तो अगदी जवळून पहायला मिळाला. सखी, पिकनिक, सनई चौघडे, झेंडा, रिंगा रिंगा, शाळा, मोरया, मॅटर, प्रतिबिंब, जन गण मन, रेगे, कॅम्पस कट्टा तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला बायकर्स अड्डा अशा मराठी चित्रपटांबरोबरच मुंबई मेरी जान आणि देख तमाशा देख या हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. आता हा तो म्हणजे संतोष जुवेकर हे तुमच्या लक्षात येईलच. या सर्वामध्ये त्याच्या अभिनयाची खरी छाप पडली ते सनई चौघडे, झेंडा, शाळा, फक्त लढ म्हणा, मोरया, रेगे, कॅम्पस कट्टा आणि बायकर्स अड्डा या चित्रपटातून असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही. कारण हे सर्वच चित्रपट संपूर्ण वेगवेगळ्या विषयांवर आधारित तर होतेच पण यातील प्रत्येक चित्रपटातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे विषयाच्या जोडीला संतोषचा रांगडा अभिनयही आपल्या मनात घर करून राहिला. संतोषला या हिंदी-मराठीच्या प्रवासात आलेले अनुभव त्याने 'सीएनएक्स'शी बोलताना शेअर केले. सामान्य माणूस महिन्यातून दोन चित्रपटच पाहू शकतो. कारण त्याच्याकडे तेवढा वेळ नसतोच आणि बजेटचाही प्रश्न प्रत्येकासमोर असतोच. त्यामुळे एका आठवड्याला तीन ते चार चित्रपट काढताना निमार्ते आणि दिग्दर्शक दोघांनी प्रेक्षकांबद्दल विचार तर करावाच पण त्याचबरोबर स्वत:च्या चित्रपटाला मिळणार्या प्रतिसादाचाही विचार करावा. कारण एका आठवड्यात इतके चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकवर्ग विभागला जाणे आणि सर्वच चित्रपटाना आर्थिक फटका बसणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी एकमेकांशी चर्चा करून तारीख ठरवली पाहिजे. (शब्दांकन- मृण्मयी मराठे)