आता 'पुन्हा दुनियादारी'!, संजय जाधव यांनी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:53 PM2022-08-11T12:53:22+5:302022-08-11T12:53:50+5:30

Sanjay Jadhav: दिग्दर्शक संजय जाधवची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

Now 'Punha Duniyadari'!, Sanjay Jadhav shared the video and gave good news to his fans | आता 'पुन्हा दुनियादारी'!, संजय जाधव यांनी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर

आता 'पुन्हा दुनियादारी'!, संजय जाधव यांनी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर

googlenewsNext

​कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणाऱ्या दुनियादारी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. कॉलेजमधील तरूणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हा चित्रपट भावला होता. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी दुनियादारी पार्ट २ (Duniyadari 2) येणार असल्याचे संकेत सोशल मीडियावर दिले आहेत. ​​

संजय जाधव यांनी इंस्टाग्रामवर दुनियादारी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, २०१३ साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं !
तेरी मेरी यारी ...चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात. एका नव्या युगाची, नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी, तेरी मेरी यारी ... आता 'पुन्हा दुनियादारी' !!!


दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक पकडत लेखक सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली ही कादंबरी संजय जाधव यांनी सिनेमाच्या रूपात पडदयावर आणली. दमदार कलाकारांनी आपल्या अभिनयाने पुस्तकातील ही पात्र सिनेमाच्या पडदयावर हुबेहूब साकारत अनेक विक्रम मोडले होते. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून प्रेक्षकांची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. 

Web Title: Now 'Punha Duniyadari'!, Sanjay Jadhav shared the video and gave good news to his fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.