आता बसस्टॉपवर दिसणार अविनाश नारकर..जाणून घ्या का ते आमच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 15:34 IST2016-12-10T13:33:03+5:302016-12-10T15:34:33+5:30

 अभिनेते अविनाश नारकर लवकरच आपल्याला बसस्टॉप या चित्रपटात एका वेगळ््या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अनेक कलाकार आपल्याला पाहायला ...

Now, Avinash Narkar will appear on the busstop | आता बसस्टॉपवर दिसणार अविनाश नारकर..जाणून घ्या का ते आमच्यासोबत

आता बसस्टॉपवर दिसणार अविनाश नारकर..जाणून घ्या का ते आमच्यासोबत

 
भिनेते अविनाश नारकर लवकरच आपल्याला बसस्टॉप या चित्रपटात एका वेगळ््या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, अमृता खानविलकर, शरद पोंक्षे, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात अविनाश नारकर वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तरुण मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. रसिका सुनीलच्या वडिलांची भूमिका यामध्ये अविनाश नारकर साकारताना दिसणार आहेत. रसिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता या चित्रपटात देखील ती बबली गर्लच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रसिका सध्या  मालिकेमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. शनाया हे तिचे निगेटिव्ह पात्र देखील प्रेक्षकांना आवडत आहे. लवकरच ती आपल्याला दोन आगामी चित्रपटांमध्ये दमदार भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच तिच्याकडे सध्या अनेक चित्रपटांसाठी चांगले प्रस्ताव असल्याचे देखील समजतेय. त्यामुळे रसिका लवकरच तिच्या चाहत्यांना मोठ्या पडदयावर दिसू शकते. रसिकाने या आधी देखील चित्रपटांमध्ये काम केलेच होते. पोश्टर गर्ल या चित्रपटात ती आपल्याला एक लावणी करताना देखील दिसली होती. रसिका फक्त एक अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम नृत्यांगणा आणि क्लासिकल सिंगर देखील आहे. लहान असल्यापासूनच रसिकाला गायनाची आवड आहे. आता ती अविनाश नारकर यांच्या सोबत लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडदयावर दिसणार आहे. 

Web Title: Now, Avinash Narkar will appear on the busstop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.