निखील महाजनचा सई आणि जितूसह नवा सिनेमा,सोशल मीडियावर केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 17:38 IST2017-05-06T12:00:15+5:302017-05-06T17:38:12+5:30
दिग्दर्शक निखील महाजन लवकरच मराठी रसिकांसाठी एक नवा सिनेमा घेऊन येत आहेत. नुकतंच या सिनेमाची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर ...

निखील महाजनचा सई आणि जितूसह नवा सिनेमा,सोशल मीडियावर केली घोषणा
द ग्दर्शक निखील महाजन लवकरच मराठी रसिकांसाठी एक नवा सिनेमा घेऊन येत आहेत. नुकतंच या सिनेमाची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. पुणे-52 आणि बाजी या सिनेमाच्या यशानंतर निखील महाजन कोणता सिनेमा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता होती. अखेर रसिकांची प्रतिक्षा संपली असून निखील महाजन यांचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. येत्या पावसाळ्यापासून या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती निखील महाजन यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. तसंच सिनेमाच्या स्टारकास्टबाबतही कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. असं असलं तरी निखील महाजन यांच्या गेल्या काही दिवसापूर्वीची पोस्ट पाहिली तर त्यावरुन त्यांच्या या आगामी सिनेमाच्या स्टारकास्टची कल्पना येऊ शकेल. निखील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले होते की सई आणि जितूसोबत काम करत असल्यामुळे तो खूप आनंदी आहे. याचाच अर्थ त्यांच्या आगामी सिनेमाचे कलाकार हे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता जितेंद्र जोशी हे असतील असा अंदाज बांधण्यात काही चुकीचं नाही. निखील महाजन यांच्या या सिनेमाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर आणि सुहृद गोडबोले करणार आहेत. या आगामी सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी सागर देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आजवर रसिकांनी जसं प्रेम दिलं तसंच प्रेम रसिक या सिनेमावरही करतील अशी अपेक्षाही निखील महाजन यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. निखील आणि त्यांची टीम लवकरच या सिनेमाशी संबंधित प्रत्येक अपडेट रसिकांपर्यंत पोहचवणार आहेत.
![]()