उपेंद्र लिमयेचा काय असणार नवीन वर्षाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 14:01 IST2016-12-31T14:01:02+5:302016-12-31T14:01:36+5:30

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार अभिनेता उपेंद्र लिमये याने नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. या नवीन वर्षी उपेंद्रला ...

New Year's Resolutions for Upendra Limaye | उपेंद्र लिमयेचा काय असणार नवीन वर्षाचा संकल्प

उपेंद्र लिमयेचा काय असणार नवीन वर्षाचा संकल्प

ल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार अभिनेता उपेंद्र लिमये याने नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. या नवीन वर्षी उपेंद्रला विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट करण्याचा तो प्ऱयत्न करणार आहे. सामाजिक आणि राजकीय अशी विविध विषयांना हात घालणारे चित्रपट करण्याचा प्ऱयत्न करणार आहे. येलो आणि जोगवा या चित्रपटानंतर आता धाटणीचे चित्रपटदेखील करणार आहे. नवीन वर्षात माझा क्षितीज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच वेगळा असणार आहे. या चित्रपटात शिक्षणासाठी संघर्ष करणाºया एका मुलीची ही कथा असणार आहे. या चित्रपटात मी शेतकºयाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका वेगळया भूमिकेत दिसणार आहे. माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. उपेंद्रने नेहमीच आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखविली आहे. त्याचा येलो हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहे. तसेच त्याने मराठी इंडस्ट्रीला येलो, मुक्ता, बांगरवाडी, कथा दोन गणपतरावांची, सावरखेड एक गाव, मेड इन चायना असे अनेक चित्रपट दिले आहेत. तसेच त्याने बॉलिवुड चित्रपटातूनदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पेज ३, ट्रॅफिक सिंग्नल, सरकार राज, कॉन्ट्रक्ट, माय नेम इज ३४० असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपट केले आहेत. त्यामुळे या अभिनेत्याने नेहमीच प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. उपेंद्रचा क्षितीज हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल या शंका नाही. 













             










 

Web Title: New Year's Resolutions for Upendra Limaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.