कलाकारांचा नवीन वर्षाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 12:15 IST2017-01-01T12:07:11+5:302017-01-01T12:15:44+5:30
बेनझीर जमादार प्रत्येकाने मोठया उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप दिला असून नवीन वर्षाचे स्वागतदेखील धुमधडाक्यात केले आहे. मागील वर्षाचे दु:ख, ...
.jpg)
कलाकारांचा नवीन वर्षाचा संकल्प
बेनझीर जमादार
प्रत्येकाने मोठया उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप दिला असून नवीन वर्षाचे स्वागतदेखील धुमधडाक्यात केले आहे. मागील वर्षाचे दु:ख, अडी-अडीचणी, अपयश विसरून पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदाने नवीन वर्षाची सुरूवात करण्यास सर्व सज्ज झालेत. २०१७ या वर्षी आपले ध्येय, स्वप्न, आशा आकांक्षा कशा पूर्ण करायच्या यासाठी सर्वांनीच नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. इतरांप्रमाणेच प्रेक्षकांचे लाडके कलाकारांनीदेखील नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. अशाच काही मराठी कलाकारांचा नवीन वर्षाचा संकल्प लोकमत सीएनएक्सने जाणवून घेतला आहे.
![]()
अमृता खानविलकर - मला फिरण्याची खूप आवड आहे सो मी माझ्या फॅमिलीसोबत खूप फिरणार आहे. मला खूप वर्षांपासून इंटिरिअर डिझायनिंगचा कोर्स करण्याची इच्छा आहे तर मी हा कोर्स २०१७ मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मला एखादे संगीतमय वादय आणि वेस्टर्न गाणे शिकायला आवडेल. त्याचप्रमाणे २०१७ ह्या वर्षी माझ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्न, आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
![]()
स्वप्निल जोशी - २०१७ या वर्षी माझ्याकडे खूपच काम आहे. त्यामुळे मायरासाठी वेळ देणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मात्र मी या सर्व कामातून वेळ काढून मायरासाठी पूर्ण वेळ देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच गेल्या वर्षी चित्रिकरण केलेले सिनेमे या वर्षी रिलीज होणार आहेत. असेच वेगवेगळे विषय असणारे चित्रपटात काम करण्यास मिळावे अशीच देवाकडे प्रार्थना करणार आहे. यावर्षीदेखील फीट आणि सुपरहिट होण्याचा संकल्पदेखील डोक्यात केला आहे.
![]()
सोनाली कुलकर्णी - माझ्याकडून नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण होत नाही. म्हणून मी सहसा संकल्प वगैरे करत नाही. आपले स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असे काही मर्यादित दिवस असावे असे मला वाटत नाही. मात्र एक आवर्जुन सांगेन की, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये मला येऊन दहा वर्षे होणार आहे. म्हणून मी ज्या दोन चार गोष्टी डोळयांसमोर ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
![]()
सिध्दार्थ जाधव - मी या नवीन वर्षात एक महत्वपूर्ण संकल्प केला आहे. मी रात्री नऊ वाजल्यानंतर फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशलमीडिया वापर करणे पूर्णपणे बंद करणार आहे. आणि माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ देणार आहे. घरी आल्यावर व्हायफाय, मोबाइल डाटा वगैरे हे सगळं बंद करणार आहे. तसेच मोबाईलपासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. फक्त चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सोशलमीडियाचा वापर करणार आहे.
![]()
प्रार्थना बेहरे - मी कधीच नवीन वर्षाचा संकल्प करत नाही. कारण आपण आपल्या नवीन संकल्पाबद्दल सुरुवातीला खूप उत्साही असतो. मात्र जसजसा काळ पुढे जातो तसतसा आपला उत्साह ही कमी होत जातो आणि पयार्याने त्या संकल्पाचे काहीच होत नाही. पण मी मात्र एक गोष्ट नित्यनियमाने पाळते ती म्हणजे नवीन वर्षात काय करायचे आणि काय नाही करायचे. या सर्व गोष्टींकडे माझा पूर्णपणे फोकस असतो. आणि त्यांनंतर वर्षाच्या शेवटच्या दिवसात या सर्व गोष्टींचा रिझल्ट लावते. तसेच आरोग्याकडेदेखील लक्ष ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.