रिना अग्रवालसाठी नवीन वर्ष महत्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 13:17 IST2016-12-31T13:17:46+5:302016-12-31T13:17:46+5:30
सध्या झाला बोभाटा या चित्रपटाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याच चित्रपटातून ...

रिना अग्रवालसाठी नवीन वर्ष महत्वाचे
स ्या झाला बोभाटा या चित्रपटाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याच चित्रपटातून झळकणारी अभिनेत्री रिना अग्रवाल ही आपला नवीन वर्षाचा संकल्प सांगते, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कारण या वर्षी माज्यासाठी खूप संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मी खूपच आनंदी आहे. तसेच छोटया आणि रूपेरी पडदयावर मला विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याचा माझा प्ऱयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षी खूप चित्रपट साइनदेखील केले आहे. या चित्रपटांमध्ये माझा एक बॉलिवुड चित्रपटदेखील असणार आहे. यामुळे माझे शेडयुल्ड खूप बिझी असले तरी, आरोग्याकचे पूर्ण लक्ष देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच वर्षाच्या सुरूवातच झाला बोभाटा या चित्रपटाने होणार आहे त्यामुळे खूपच आनंदित आहे. या चित्रपटात माझ्यासोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, मयुरेश पेम, मोनालिसा बागल, कमलेश सावंत असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी रिनाने अजिंठा चित्रपटातून फिल्म करिअरची सुरुवात केली आहे. रिनाने बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनीसल्ट सोबत तलाश या चित्रपटात कामदेखील केले आहे. रिना नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. वास्ताविक जीवनातले राहणीमान आणि विचारसरणींपेक्षा अतिशय वेगळे रोल तिने स्वीकारले आहेत. कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी आपल्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टींमध्ये बदल कराण्याची गरज असते. भूमिकेसाठी लागणारी भाषा, राहणीमान, पेहराव या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आणि रिनाने नेहमीच तिच्या भूमिकांना सगळ्या गोष्टींद्वारे शंभर टक्के न्याय दिला आहे.