सूर नवा ध्यास नवाच्या प्रसनजीत कोसंबीचे हे स्वप्न अवधूत गुप्तेने केले पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 10:02 IST2018-05-04T04:30:59+5:302018-05-04T10:02:38+5:30
प्रसनजीत कोसंबी हे नाव सारेगमपा या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. नुकताच तो 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोमध्ये ...
सूर नवा ध्यास नवाच्या प्रसनजीत कोसंबीचे हे स्वप्न अवधूत गुप्तेने केले पूर्ण
प रसनजीत कोसंबी हे नाव सारेगमपा या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. नुकताच तो 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. या कार्यक्रमात त्याने एकाहून एक परफॉर्मन्स सादर केले होते. त्याच्या गायकीचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. आता प्रसनजीत कोसंबी लवकरच 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिअॅलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खुश होऊन 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोचा परीक्षक अवधुत गुप्तेने 'माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील!' असे त्याला वचन दिले होते आणि हेच वचन पूर्ण करत अवधुतने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'वाघेऱ्या' सिनेमाचे, प्रमोशनल साँग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आले.
समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित 'वाघेऱ्या' सिनेमाचे हे प्रमोशनल सॉंग खुद्द दिग्दर्शक समीर आशा पाटीलनेच लिहिले असून या गाण्याला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. ग्रामीण विनोदावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रमोशनल गाणं करण्याची संधी जेव्हा अवधूतला मिळाली तेव्हा त्याला प्रसनजीतला दिलेले वचन आठवले. तेव्हा त्याने प्रस्तुतकर्ते ‘सुप्रीम मोशन पिक्चर्स’चे राजेंद्र शिंदे यांना हे गाणं प्रसनजीतकडूनच गाऊन घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्याच्या या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या वचनपूर्तीमध्ये आपला सहभाग दर्शविला.
गौरमा मीडिया अँड एन्टरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या धम्माल विनोदीपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकार झळकणार असून उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यास येत असलेल्या या सिनेमातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका उडवणारे ठरणार आहे.
Also Read : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण