​संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:15 IST2018-04-04T05:45:25+5:302018-04-04T11:15:25+5:30

संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड देखील होत आहेत. ...

The new action-packed movie directed by Santosh Manjrekar | ​संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

​संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

वेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड देखील होत आहेत. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला  आगामी बेधडक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
बेधडकचे पहिले टायटल पोस्टर जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. तेव्हापासूनच या चित्रपटाने उत्सुकता निर्माण केली होती. आता या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियात नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेला बलदंड हात दिसत आहे. तसेच सामान्य स्वप्नांचा, असामान्य पाठलाग अशी या चित्रपटाची टॅगलाईन देखील दिसत आहे. त्यावरून हा चित्रपट बॉक्सिंगवरचा आणि अॅक्शनपॅक्ड असणार हे स्पष्ट होत आहे. 
राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी बेधडक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी या चित्रपटाचे लेखन सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. 
'बेधडक' हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्या अभिनेत्याचे या चित्रपटातून पदार्पण होणार असल्याने या चित्रपटाविषयी सगळ्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल', असे निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितले.
बेधडक या चित्रपटाच्या टीजर पोस्टरला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टरमध्ये आपल्याला अभिनेत्याचा चेहरा दिसत नसला तरी हा अभिनेता कसा दिसतोय अशी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार असे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. 

Web Title: The new action-packed movie directed by Santosh Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.