नाना पाटेकर नाटक करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:14 PM2018-02-20T12:14:25+5:302018-02-20T17:44:25+5:30

माझ्यासाठी चांगली संहिता शोध, मला आता रंगमंचावर यावे आणि मस्त नाटक करावे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे... चंदू तू ...

Nana Patekar will play drama! | नाना पाटेकर नाटक करणार!

नाना पाटेकर नाटक करणार!

googlenewsNext
झ्यासाठी चांगली संहिता शोध, मला आता रंगमंचावर यावे आणि मस्त नाटक करावे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे... चंदू तू माझ्यासाठी चांगलं नाटक शोध... अशी सूचना प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांनी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना केली.प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असणाºया ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा २५० वा प्रयोग मुंबईत दिनानाथ नाट्यगृहात झाला. त्यासाठी म्हणून नाना सपरिवार उपस्थित होते. प्रशांत दामले एवढे महिन्याला २५ नाही पण किमान २५ प्रयोग तरी मी त्या नाटकाचे नक्कीच करेन... असेही यावेळी बोलताना नाना म्हणाले. काय धमाल काम करता रे तुम्ही, एवढी एनर्जी येते तरी कुठून... असे सांगत नानाने प्रत्येक कलावंताचे कौतुक केले. गेले दोन अडीच तास नाना रंगमंदिराच्या अंधारात बसून रंगमंचाकडे पहात होते. आता त्यांनी रंगमंचावर येऊन पुन्हा एकदा हा उजेड अंगावर घ्यायला हवा,असे आवाहन चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी केले.तुमच्या नाटकात येण्याने रंगभूमीवर चैतन्य येईल आणि त्यातून नाटकांना पुन्हा एकदा वेग येईल असेही ते म्हणाले.त्यावर नानाने प्रशांत दामले एवढी एनर्जी आता माझ्यात नाही,आणि मी ती आणू शकेन का? असा मिश्किल सवालही केला.शुभांगी गोखले यांना उद्देशून नाना म्हणाले, तू जे काम करतेस त्याचं कौतुक नाही करणार, कारण तू जे करतेस ते तसे केले नसते तर मग मात्र मी बोललो असतो तुला... त्यावर उपस्थितांनीही त्याला हसून दाद दिली.'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाच्या २५० व्या प्रयोगानिमित्त नानाने सगळ्या टीम सोबत फोटोही काढून घेतले.

Also Read:साखर खाल्लेला माणूस हे नाटक करतयं मधुमेहाविषयी जनजागृती

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात जर मधुमेहसारखा गंभीर आजार असेल तर व्यक्ती हा त्याची पर्वा करत नाही.त्यासाठी या आजाराविषयी आरोग्यविषयक प्रकाशनं, शासकीय व खासगी जाहिराती, वृत्तपत्रं-नियतकालिकांमधून मोठया प्रमाणात जनजागृती करत असल्याचे पाहायला मिळत आहे.आता मात्र या आजाराविषयी नाटयसृष्ट्रीनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके अभिनेते प्रशांत दामले हे मधुमेहाविषयी जनजागृती करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.लेखक विद्यासागर अध्यापक यांनी  हे नाटक लिहिलं आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. 

Web Title: Nana Patekar will play drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.