नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:54 PM2024-04-27T12:54:09+5:302024-04-27T12:56:25+5:30

'नाच गं घुमा' निमित्तानेे लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना नम्रता संभेरावने तिच्या मोलकरणीचा धमाल किस्सा सांगितलाय (namrata sambherao, nach ga ghuma)

Namrata Sambherao house help give her advice give her nach ga ghuma | नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते....

नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते....

'नाच गं घुमा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमातून मालकीण आणि मोलकरीण यांच्या अनोख्या नात्याची गोष्ट समोर येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने सध्या संपूर्ण टीम  फिरत आहे. अशातच लोकमत फिल्मीशी बोलताना नम्रता संभेरावने दिलखुलास संवाद साधला. नम्रता सिनेमात आशाताई या मोलकरणीची भूमिका साकारत आहे. त्यानिमित्ताने नम्रताने खऱ्या आयुष्यातील आशाताईंना काय सल्ला दिला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नम्रताने खास उत्तर दिलं.

नम्रता या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली, "मी त्यांना सल्ला देणं दूर.. माझ्याच आशाताईंनी मला सल्ला दिलाय. मी प्रमोशनला फिरतेय. आणि ती सुट्टी घेऊन गावी चालली आहे एक महिन्यासाठी. दुष्काळात तेरावा महिना. त्यामुळे तिने मला सांगितलं की एक महिना मी नाहीये. तर मी तिला विचारलं तुझ्या बदली कोणी असेल, तुझी बहिण वैगरे तर तिला पाठव. तर ती म्हणाली, ती सुद्धा नाही येऊ शकत कारण तिलाही मी गावी घेऊन चालली आहे."

नम्रता पुढे म्हणाली,  "त्यामुळे तिचा सल्ला आहे की, तुम्ही तुमचं बघा काय ते, मी चालले फिरायला. मला टेंशन हे आलंय की मला तिला सिनेमा दाखवायचा होता पण ती तिच्या गावी चालली आहे त्यामुळे हे पण मी करू शकत नाही." 'नाच गं घुमा' सिनेमा १ मे २०२४ ला रिलीज होत असून सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नम्रता या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Namrata Sambherao house help give her advice give her nach ga ghuma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.