क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 12:50 IST2016-12-18T12:50:22+5:302016-12-18T12:50:22+5:30
मराठवाडय़ातील ४० प्रगतशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या-त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार असून या माध्यमातून ...
क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार
म ाठवाडय़ातील ४० प्रगतशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या-त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार असून या माध्यमातून शेतीमालाला शहरातून थेट मार्केट उपलब्ध करून चांगला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनच्या परभणी तालुक्यातील झरी येथे करण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख होते.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिलाई मशीनचे वाटप करून महिलांचेही क्लस्टर तयार करून त्यांना वर्षभर पुरेल इतके काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गारमेंट्सच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. झरी येथे महिलांनी सुरू केलेले शिवणकाम याचे अत्यंत चांगले उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर ड्रीप एरिगेशनचा प्रयोगही ५० शेतकऱ्यांनी नाम मदतीने राबविल्याने आलेल्या उत्पादनातील मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच अनुषंगाने युवकांनी संशोधित केलेल्या कृषीशी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्याही दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही अनासपुरे यांनी सांगितले.
झरीचा आदर्श देशात निर्माण करू
झरी या गावाने जलसंधारणासह महिला, शेतकरी व युवकांसाठी राबविलेले उपक्रम राज्यभर गाजले आहेतच. युवकांसाठी सुरू झालेली व्यायामशाळा असो की महिलांचे शिलाई मशीनचे युनिट असो, सर्व काही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आता नामतर्फे वाचनालय, महिलांसाठी सभागृह बांधले जाणार आहे. जलसंधारणाची कामाची दखल तर राज्यभर झाली असून झरीत नामकडून आणखी योजना राबवू, लागेल ते देऊ, पण त्याचा विनियोग चांगला करून शाश्वत काम उभारा, असेही आवाहन करताना झरीचे नाव देशात पोचले पाहिजे, असेही अनासपुरे म्हणाले.