'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:10 PM2023-03-28T13:10:10+5:302023-03-28T13:11:21+5:30

'सैराट'ची टीम पुन्हा कधी एकत्र येणार यावरही नागराज मंजुळेंनी उत्तर दिलं आहे.

nagraj manjule answers why he has not takes rinku rajguru in next film ghar banduk biryani | 'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर

'घर बंदुक..' मध्ये परश्या आहे मग 'आर्ची' का नाही? नागराज मंजुळेने एकाच वाक्यात दिलं उत्तर

googlenewsNext

'सैराट' फेम नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) सिनेमा म्हणलं की काहीतरी हटके असणार यात शंका नाही. आता तो 'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा घेऊन येत आहे. यामध्ये सर्वांचा लाडका परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) मुख्य भूमिकेत आहे. परश्या आहे मग आर्ची का नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावर नागराजने उत्तर दिलंय.

'सैराट' सिनेमातून लोकप्रिय झालेली परश्या आणि आर्चीची जोडी पुन्हा एकत्र कधी बघायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आगामी 'घर बंदुक बिरयानी' मध्ये आकाशसोबत अभिनेत्री सायली पाटील (Sayli Patil) मुख्य भूमिकेत आहे. यामध्येही आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) का घेतलं नाही असा प्रश्न नागराजला एका मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा त्याने एकाच वाक्यात उत्तर दिले. तो म्हणाला, 'या फिल्ममध्ये जशी कास्टिंगची गरज होती तशी निवड करण्यात आली आहे.'

2016 मध्ये आलेला 'सैराट' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. यामधील परश्या-आर्चीचं गावाकडचं प्रेम, कुटुंबाचा विरोध, विरह आणि त्यातून होणारा कलह अप्रतिमरित्या मांडण्यात आलं. आता पुन्हा सैराटची टीम कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार का यावरही 'नक्कीच येईल' असं नागराजने सांगितलं. आता पुन्हा परश्या-आर्चीची आयकॉनिक जोडी पडद्यावर कधी बघायला मिळणार यासाठी प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे.

Web Title: nagraj manjule answers why he has not takes rinku rajguru in next film ghar banduk biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.