​पाकिस्तानमध्येही झळकणार नागराज मंजुळेचा सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:33 IST2018-03-28T13:03:04+5:302018-03-28T18:33:04+5:30

पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटाच्या प्रदर्शनावरून नेहमीच वाद रंगत असतो. भारतीय चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये असे तेथील अनेकांचे मत आहे. ...

Nagaraj Manjule's Sarat will also be seen in Pakistan | ​पाकिस्तानमध्येही झळकणार नागराज मंजुळेचा सैराट

​पाकिस्तानमध्येही झळकणार नागराज मंजुळेचा सैराट

किस्तानमध्ये भारतीय चित्रपटाच्या प्रदर्शनावरून नेहमीच वाद रंगत असतो. भारतीय चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये असे तेथील अनेकांचे मत आहे. पण कलेला देशातील मतभेदांमध्ये आणले जाऊ नये असे मानणारा देखील एक गट पाकिस्तानमध्ये आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा चित्रपटसृष्टी अधिक प्रगत आहे. तसेच आपले चित्रपट देशभरातील अनेक फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवले जातात. पण पाकिस्तान यासाठी अपवाद आहेत. कारण आपल्यासारखे फिल्म फेस्टिव्हल्स पाकिस्तानमध्ये होत नाहीत. पण पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये एक फिल्म फेस्टिव्हल होणार असून त्यात जगभरातील चित्रपट दाखवण्यासोबतच काही भारतीय चित्रपट देखील दाखवण्यात येणार आहेत. हे पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कराची येथे होणार असून भारतातील काही महत्त्वाच्या चित्रपटांची या फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. 
भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त गल्ला जमवलेला बाहुबली तसेच नागराज मंजुळे यांचा सैराट हे चित्रपट पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल येथे दाखवले जाणार आहेत. या चित्रपटासोबतच या फेस्टिव्हलसाठी डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. बाहुबली या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी ट्वीट करून याबाबत सांगितले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बाहुबली या चित्रपटामुळे मी आजवर अनेक देशांमध्ये फिरलो आहे. आता मी या चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानला जाणार आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद... 
सैराट या चित्रपटाने आजवर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सैराट या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असला तरी त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. सैराट या चित्रपटाचे कौतुक केवळ मराठी चित्रपटक्षेत्रातीलच नव्हे तर बॉलिवूडमधील मंडळींनी देखील केले होते. या चित्रपटातील गाणी तर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. 
पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये मराठी चित्रपट निवडला गेला असल्याने मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. 

Web Title: Nagaraj Manjule's Sarat will also be seen in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.