शनाया या कारणासाठी सोडणार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 14:00 IST2016-12-10T13:06:39+5:302016-12-12T14:00:28+5:30
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत असल्याचे कळतेय. रसिका सध्या या ...

शनाया या कारणासाठी सोडणार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका?
म झ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत असल्याचे कळतेय. रसिका सध्या या मालिकेमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. शनाया हे तिचे निगेटिव्ह पात्र देखील प्रेक्षकांना आवडत आहे. लवकरच ती आपल्याला दोन आगामी चित्रपटांमध्ये दमदार भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच तिच्याकडे सध्या अनेक चित्रपटांसाठी चांगले प्रस्ताव असल्याचे देखील समजतेय. त्यामुळे रसिका लवकरच तिच्या चाहत्यांना मोठ्या पडदयावर दिसू शकते. रसिकाने या आधी देखील चित्रपटांमध्ये काम केलेच होते. पोश्टर गर्ल या चित्रपटात ती आपल्याला एक लावणी करताना देखील दिसली होती. रसिका फक्त एक अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम नृत्यांगणा आणि क्लासिकल सिंगर देखील आहे. लहान असल्यापासूनच रसिकाला गायनाची आवड आहे. ती अतिशय मधुर आवाजात गाणी गाते. मालिकेतील तिचे कॅरेक्टर जरी निगेटिव्ह शेडचे असले तरी रसिका मात्र तिच्या रिअल लाईफमध्ये अगदी अपोझिट आहे. लवकरच ती प्रेक्षकांना वेगळ््या भूमिकेत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटतील रसिकाची भूमिका एकदमच हटके असल्याने प्रेक्षक नक्कीच तिला त्या भूमिकेत पाहून आश्चर्यचकीत झाल्या शिवाय राहणार नाहीत. सध्या मला अनेक चित्रपटांचे प्रस्ताव येत आहेत. पण मी माझ्या मालिकेकडेच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असल्याने मी काही चित्रपट स्वीकारत नाहीये. मी लवकरच थोडा वेळ काढून काही दिवसांतच चित्रपटांमध्ये दिसेल असे रसिकाने सांगितले आहे.