​‘रॉयल ओपेरा हाऊस’वर संगीतकाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 12:56 IST2016-04-01T19:56:06+5:302016-04-01T12:56:06+5:30

संगीत त्याची तपश्चर्या होती. गेली 25 वर्षे तो संगीताची सेवा करत होता. परंतु याच संगीतामुळे त्याला ऐकण्याची शक्ती गमवावी ...

The musician is accused of 'Royal Opera House' | ​‘रॉयल ओपेरा हाऊस’वर संगीतकाराचा आरोप

​‘रॉयल ओपेरा हाऊस’वर संगीतकाराचा आरोप

गीत त्याची तपश्चर्या होती. गेली 25 वर्षे तो संगीताची सेवा करत होता. परंतु याच संगीतामुळे त्याला ऐकण्याची शक्ती गमवावी लागली. बहिरेपणापेक्षा संगीतकाराला सर्वात मोठा श्राप काय असू शकतो?

ही कहाणी आहे क्रिस गोल्डश्नेएरची. 2002 पासून तो पाश्चात्य संगीताची पंढरी ‘रॉयल ओपेरा हाऊस’ येथे व्हायोला प्लेयर (व्हायोलिनसारखे एक तंतुवाद्य) म्हणून कार्यरत होता. सर्व काही ठिक चालू असताना दोन वर्षांपूर्वीपासून त्याला ऐकण्यास त्रास जाणवू लागला.

त्रास एवढा वाढला की, जेवताना प्लेटचा होणारा आवजही त्याला सहन होईनासा झाला. सर्वात दुखद बाब म्हणजे त्याला करिअर सोडावे लागले. या परिस्थितीसाठी तो ‘रॉयल ओपेरा हाऊस’ला कारणीभूत मानतो. तसा त्याने कोर्टात देखील दावा केला आहे.

त्याचे मते, महान संगीतकार वॅग्नर यांच्या ‘डाय वॉल्क्युर’ची रिहर्सल करत असताना त्याच्या मागे ठेवलेल्या ब्रास नावाच्या वाद्याच्या आवाजामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली. सुमारे 137 डेसिबल एवढा मोठा आवाज त्यातून येतो. विमानाच्या आवाजाएवढा तो आहे.

दैनंदिन काम करताना क्रिसला आता आवाज कमी करणारे ‘इअर प्रोटेक्टर’ घालून वावरावे लागते. ‘रॉयल ओपेरा हाऊस’ने क्रिसचा दावा फेटाळून लावला आहे. परंतु एक सत्य हेदेखील आहे की, तेथे काम करणारे सुमारे 25 टक्के लोकांना कानाच्या विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.

Web Title: The musician is accused of 'Royal Opera House'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.