​‘मधु इथे अन चंद्र तिथे’चं अंकुशच्या हस्ते संगीत प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 14:14 IST2016-05-31T08:44:02+5:302016-05-31T14:14:02+5:30

‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या विनोदीपटाचा धमाकेदार संगीत प्रकाशन सोहळा अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. ...

Music publication at the hands of 'Madhu Hai Ek Chandra' | ​‘मधु इथे अन चंद्र तिथे’चं अंकुशच्या हस्ते संगीत प्रकाशन

​‘मधु इथे अन चंद्र तिथे’चं अंकुशच्या हस्ते संगीत प्रकाशन

धु इथे अन् चंद्र तिथे’ या विनोदीपटाचा धमाकेदार संगीत प्रकाशन सोहळा अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. हा चित्रपट १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ हा मनोरंजक चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असे सांगत अंकुशने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

‘मधु इथे अन चंद्र तिथे’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक रंजक कथा मांडण्यात आलेली आहे. प्रत्येक शहराचे एक स्वतंत्र वैशिट्य असते. हेच वैशिष्ट्य घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाºया धमाल कथेची सांगड म्हणजे ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ हा चित्रपट होय.

‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झी टॉकीज आणि रत्नकांत जगताप यांनी केली असून दिग्दर्शक संजय झणकर आहेत. आनंद इंगळे, भाऊ कदम, किशोर चौघुले, शैला काणेकर, विशाखा सुभेदार, संजय मोहिते, गणेश रेवडेकर, रवींद्र तन्वर, ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळीकर या चित्रपटात दिसणार आहे. १२ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. हा चित्रपट प्रेक्षकांना झी टॉकीजवर पहाता येणार आहे.

Web Title: Music publication at the hands of 'Madhu Hai Ek Chandra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.