‘रेती’चे म्युझिक लॉँच - शानचे मराठी संगीत दिग्दर्शनात पदार्पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 08:14 IST2016-03-25T15:14:59+5:302016-03-25T08:14:59+5:30
समाजातीर्ल धगधगत्या विषयावरचा मल्टिस्टारर ‘रेती’ येत्या एप्रिलमध्ये रजतपटावर झळकणार आहे. या चित्रपटातील गाण्यांचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. ...

‘रेती’चे म्युझिक लॉँच - शानचे मराठी संगीत दिग्दर्शनात पदार्पण...
समाजातीर्ल धगधगत्या विषयावरचा मल्टिस्टारर ‘रेती’ येत्या एप्रिलमध्ये रजतपटावर झळकणार आहे. या चित्रपटातील गाण्यांचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. या चित्रपटाची खासियत म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय गायक शान या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
वाळुमाफिया, राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांची कोट्यवधीच्या कमाईसाठी अभद्र हातमिळवणी आणि निसर्गसंपत्तीवर मारला जात असलेला डल्ला यांवर या चित्रपटात बेधडक भाष्य आहे. अथर्व मुव्हीजच्या ‘रेती’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, किशोर कदम, शशांक शेंडे, संजय खापरे, सुहास पळशीकर, विद्याधर जोशी, गायत्री सोहम, दीपक करंजीकर, मौसमी तोंडवळकर, भाग्यश्री राणे अशा नावाजलेल्या कलावंतांची मांदियाळी आहे. शानने संगीत दिलेली गाणी तरुणाईच्या ओठांवर खेळतील अशी आहेत. ‘रेती’मध्ये कमनीय बांध्याच्या रश्मी राजपूतचे आयटम साँगही असून निृत्यदिग्दर्शन हिमांशु कुमार आणि गौरव शेट्टी यांनी केले आहे.
‘रेती’चे बहुतांश चित्रीकरण सटाणा, नामपूर, देवळा, नाशिक आणि मुंबईत झाले असून सुहास भोसले या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘रेती’च्या म्युझिक लाँचसाठी चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे, कार्यकारी निर्माता अरुण रहाणे, कथा, पठकथा संवादलेखक दवेन कापडनीस, छायाचित्रकार प्रताप नायर, गीतकार संजय कृष्णाजी पाटील, संगीत दिग्दर्शक शान, गायक निहीरा जोशी, अपेक्षा दांडेकर, संकलक केदार गोगटे असा सगळा चमू उपस्थित होता.