मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सोनालीला बसला फटका,मात्र ‘त्या’च्यामुळे सोनालीची झाली ‘सोकुल’ सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 16:56 IST2018-04-06T09:54:09+5:302018-04-06T16:56:54+5:30

धावणारे, पळणारे शहर म्हणजे मुंबई. मुंबईत प्रत्येकजण कायम धावत पळत असतो. त्यामुळे या धावणा-या पळणा-या शहरात वाहतूक कोंडीची ही ...

Mumbai's traffic congestion hit Sonali, but Sonal got rid of 'Sakul' because of her | मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सोनालीला बसला फटका,मात्र ‘त्या’च्यामुळे सोनालीची झाली ‘सोकुल’ सुटका

मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सोनालीला बसला फटका,मात्र ‘त्या’च्यामुळे सोनालीची झाली ‘सोकुल’ सुटका

वणारे, पळणारे शहर म्हणजे मुंबई. मुंबईत प्रत्येकजण कायम धावत पळत असतो. त्यामुळे या धावणा-या पळणा-या शहरात वाहतूक कोंडीची ही समस्या पाहायला मिळते. त्यातच सध्या मुंबईत जागोजागी मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य मुंबईकर मेताकुटीला येतो. केवळ सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींनासुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा या वाहतूक कोंडीत तासनतास खोळंबलेले असतात. मात्र पर्याय नसल्याने कोंडी सुटेपर्यंत त्यांना ताटकळत राहावं लागतं. कारण सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहता ते बाहेर आल्यास कोंडीत भर पडण्याचीच भीती जास्त असते. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याला अपवाद ठरली आहे. त्याचे झाले असं की सोनाली सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी प्रभादेवीकडे निघाली होती. मात्र मेट्रोच्या कामामुळे बहुदा ती वाहतूक कोंडीत अडकली. त्यावेळी कशाचाही विचार न करता तिने बाईकस्वाराची मदत घेत सिद्धीविनायक मंदिर गाठलं. खुद्द सोनालीनं ट्विट करुन हा किस्सा शेअर केला आहे. सोनाली म्हणते, “मला योगायोग आवडतात.गुलाबजाम सिनेमाच्या टीमसोबत सिद्धीविनायक मंदिरात पोहचायचं होतं. मात्र वाहतूक कोंडीत अडकले होते. कारमधून बाहेर येऊन मी लिफ्ट मागितली. खालिदचे आभार ज्याने मला त्याच्या बाइकवरुन सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पोहोचवलं. खालिद तू अक्षरश: देवासारखा धावून आलास”, असं सोनालीने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.सोनालीला सिद्धीविनायक मंदिरापर्यंत लिफ्ट देणारा हा खालिद कोण अशा चर्चा सोनालीच्या ट्विटनंतर सुरु झाल्या आहेत. तसंच सोकुल सोनालीच्या मदतीसाठी देवासारखा धावून येणा-या खालिदवर कौतुकाचा वर्षावही होत आहे. 

काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे.सोनालीला सायकलिंगची आवड आहे.ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

Web Title: Mumbai's traffic congestion hit Sonali, but Sonal got rid of 'Sakul' because of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.