‘मुंबई पुणे मुंबई – ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 12:34 IST2017-10-23T07:04:22+5:302017-10-23T12:34:22+5:30

पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. ...

'Mumbai Pune Mumbai - 3' Meet the audience | ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘मुंबई पुणे मुंबई – ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

च वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्या चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई -2 लग्नाला यायचंच’ नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माता अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८  रोजी  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्याचित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची हि पहिलीच वेळ आहे.

 या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या भागाच्या निमित्ताने बोलताना राजवाडे म्हणाले,  मुंबई पुणे मुंबई भाग पहिला करताना हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना इतका आवडेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती, मराठी‘मुंबई पुणे मुंबई (MPM) हा सिनेमा ऐक प्रथाच (cult) म्हणून मानला जातो, आणि लव स्टोरी ची ऐक मोठी ट्रेन्ड (MPM) नि सुरु केली. (MPM) हि आता सवय झाली आहे, आणि रसिक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या जीवना मध्ये आता काय घडते आहे ह्याची उत्सुकता लागली आहे कारण प्रत्येक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या गोष्टी हि आपली स्वताची गोष्ट वाटते.

 “मूळ चित्रपट करताना त्याचा सिक्वेल येईल असे काही वाटले नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई -2 लग्नाला यायचंच’ हा सिक्वेल करत असताना मात्र आम्ही चित्रपटाचा तिसरा भागही बनवू शकतो हे मात्र जाणवले होते. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल याची आम्ही हमी देऊ शकतो.” असे दिग्दर्शक सतीश राजवाडे.  

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, “ माझ्या पहिल्या सिनेमापासून एव्हरेस्ट एन्टरटेनमेंट आणि अमित भानुशाली यांनी  एकत्रित अनेक मराठी सिनेमे केले आहेत. हे संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने आम्ही एकत्रित येऊन ‘मुंबई पुणे मुंबई – २’ची निर्मिती केलेली होती. पण आता ‘मुंबई पुणे मुंबई -३ मुळे ही मैत्री अधिक घट्ट होण्यास मदत होईल. त्यामुळे मला दुसऱ्यांदा अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रतिथयश दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.”  

पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपपाटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रिमेक’ झाले तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढील भाग बनावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती. रसिकांनी त्यांची पसंती ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई –2’ च्या तिकीट खिडकीवरील गर्दीतून आधीच व्यक्त केली होती.

Web Title: 'Mumbai Pune Mumbai - 3' Meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.