मुक्ता बर्वेचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 11:41 IST2017-01-29T06:11:11+5:302017-01-29T11:41:11+5:30

नाटक आणि चित्रपटाच्या माध्ममातून आपल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने  प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. मुक्ता नेहमी प्रेक्षकांना एका वेगळया ...

Mukta Barvecha's Late Look | मुक्ता बर्वेचा हटके लूक

मुक्ता बर्वेचा हटके लूक

टक आणि चित्रपटाच्या माध्ममातून आपल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने  प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. मुक्ता नेहमी प्रेक्षकांना एका वेगळया शांत व सोज्वळ भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळाली. मात्र सध्या या अभिनेत्रीचे झक्कास आणि हटके फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमधील तिचा तिचा लूक नक्कीच तिच्या चाहत्यांना घायाळ करेल अशा प्रकारचा आहे. मुक्ताला यापूर्वी कधीच आपण अशा हॉट आणि स्वीट लूकमध्ये पाहिले नाही. मात्र या फोटोतील तिची अदा लाजवाब आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या या लूकचे कौतुकदेखील सोशलमीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून करताना दिसत आहे. या फोटोतील तिच्या सौदर्याला मेकअप मॅन विनोद सरोदे याने चार चाँद लावले आहेत. मुक्ताचे हे फोटो पाहता तिच्या चाहत्यांना तिचा कोणता आगामी चित्रपटाची तयारी सुरू आहे का असे वाटले असणार हे साहजिकच आहे. मात्र तिचा  हा लूक तिने कोणत्या चित्रपटासाठी केला आहे का हे अदयापदेखील कळाले नाही. मात्र सध्या मुक्ता तिच्या नाटकामध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी मुक्ताने मराठी चित्रपटसृष्टीला मुंबई पुणे मुंबई, डबलसीट, जोगवा, गणवेश, वायझेड, लग्न पाहावे करून, मंगलाअष्टक वन्स मोअर, गोळा बेरीज, बदाम राणी गुलाम चोर, एक डाव धोबीपछाड असे अनेक सुपरीहीट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर दीपस्तंभ, लव बर्डस्, कोडमंत्र, इंदिरा, छापा काटा, रंग नवा, कबड्डी कबड्डी, फायनल ड्राफ्ट अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून मुक्ताने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

Web Title: Mukta Barvecha's Late Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.