ओव्हर अक्टिंग कमी करा म्हणणाऱ्या ट्रोलर्सला मृण्मयी देशपांडेनं दिले सडेतोड उत्तर,वाचा काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:36 PM2021-07-03T17:36:22+5:302021-07-03T17:43:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून ''सा रे ग म प लिटिल चॅम्प्स”चे पंचपत्न सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक चांगले आहेत पण पंचरत्नच जरा ओव्हर एक्टींग करत असल्याचे म्हणत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

Mrunmayee Deshpande Brilliantly Slams Trollers, Know The Reason | ओव्हर अक्टिंग कमी करा म्हणणाऱ्या ट्रोलर्सला मृण्मयी देशपांडेनं दिले सडेतोड उत्तर,वाचा काय म्हणाली

ओव्हर अक्टिंग कमी करा म्हणणाऱ्या ट्रोलर्सला मृण्मयी देशपांडेनं दिले सडेतोड उत्तर,वाचा काय म्हणाली

googlenewsNext

१२ वर्षांनी ''सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” पुन्हा एकदा नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला आले आहे. नुकताच सुरु झालेला कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेता विषय ठरत आहे. यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी आहेत, हे ज्युरी म्हणून ‘पंचरत्न’ नवीन भूमिकेत दिसत आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसतात. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करत आहे.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब असलेली अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे हिच्याकडे पाहिले जाते. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

गेल्या काही दिवसांपासून पंचपत्न सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक चांगले आहेत पण पंचरत्नच जरा ओव्हर एक्टींग करत असल्याचे म्हणत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर मेजशीर मिम्सही व्हायरल होत आहेत. नेटीझन्स इथवरच थांबले नाहीतर त्यांनी सुत्रसंचालन करणारी मृण्मयीवरही निशाणा साधला आहे. तिच्यावरही कमेंट करत तिलाही ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात. यावर शांत न बसता मृण्मयीनेही ट्रोलर्सला चांगलेच उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का ?'  मृण्मयीने दिलेले सडतोड उत्तर वाचून अनेकांनी प्रतिक्रिया देत मृण्मयीलाच सपोर्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी जुनेच पर्व चांगले असल्याचे म्हणत त्यावेळी सुत्रसंचालन करणारी पल्लवी जोशीची आठवण काढताना दिसले. 

Web Title: Mrunmayee Deshpande Brilliantly Slams Trollers, Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.